Nawab-Malik-NCP
Nawab-Malik-NCP sakal media
महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं ईडीसमोर आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

ED raided on Nawab Malik House : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले आहेत. सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जात आहे. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना कार्यलयाच्या थोड्या अंतरावरच थांबवलं आहे. त्यांना ईडीच्या परिसरात जाऊ दिलं जात नाहीये. मात्र, कार्यकर्ते आक्रमक पावित्र्यात असून ईडी आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.

नवाब मलिक एनसीबी विरोधात आवाज उठवत होते तेव्हाच त्यांनी ट्विट केलं होतं की माझ्या घरी पाहुणे येणार आहेत. आज ते पाहुणे आले आहेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. भाजप नेत्यांविरोधात ईडीच्या नोटिसीचे काय झाले? नारायण राणे, बबनराव पाचपुते यांच्यासह इतर नेत्यांविरोधातील तक्रारीचे काय झाले? असा सवाल राष्ट्रवादी युवा काँग्रेसने केला आहे. 'आम्ही येत आहोत, अडवून दाखवा' अशा इशारासुद्धा राष्ट्रवादीने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT