Ajit Pawar
Ajit Pawar 
महाराष्ट्र

LokSabha 2019 : उमेदवार विजयसिंहच होते; त्यांनी फोनच बंद ठेवला : पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे : विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातून लढावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. मी त्याला साक्षीदार आहे. मात्र मोहिते पाटलांनी दुसऱ्या नावाचा आग्रह धरला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार यांनी दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का समजला होता. माढ्यातून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

अजित पवार म्हणाले, की विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यायचे ठरले होते. त्यांनी उमेवारी घेतली नाही. त्यांनी जे नाव पुढं केलं होते, त्याला माळशिरस वगळता मतदार संघातून विरोध होता. जयंत पाटील आणि पवार साहेबांचे पीए विजयसिंह मोहिते पाटील यांना फोन करत होते. मात्र शेवटचे दोन दिवस त्यांनी फोन बंद करुन ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'साराभाई' फेम अभिनेत्री करणार भाजपमध्ये प्रवेश!

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

Laptop Overheating : उन्हाळ्यात लॅपटॉप होतोय अधिक गरम? ब्लास्ट होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

गर्भ लिंग निदान चाचण्यांवरील बंदीमुळे स्त्री भ्रूणहत्या थांबू शकते, परंतू... IMA अध्यक्षांचे मोठे वक्तव्य

Ankur Warikoo's weight loss diet: अंकुर वारीकूने छोले भटोरे, गोड बंद न करता १० किलो वजन केलं कमी, पण कसं?

SCROLL FOR NEXT