Congress, NCP
Congress, NCP 
महाराष्ट्र

विधानसभेला आघाडी तुटणार?; राष्ट्रवादीचा फॉर्म्युला काँग्रेसला अमान्य

वृत्तसंस्था

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेसाठी बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपासंबंधी राष्ट्रवादीकडून नवा फॉर्म्युला मांडण्यात असून, काँग्रेसला हा फॉर्म्युला मान्य नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे आतापासूनच आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे. 

राष्ट्रवादीने आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी 50-50 चा फॉर्म्युला वापर करत समसमान जागा लढवाव्यात, असा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्रात आघाडी करताना जागावाटपात याआधी राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस नेहमीच वरचढ राहिली आहे. पण आता चित्र बदलले असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. कारण मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तसेच आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी काँग्रेसच्या तुलनेत उजवी ठरली आहे. याचाच दाखला देत आता राष्ट्रवादीने हा फॉर्म्युला मांडला आहे.

2014च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांसह ज्या जागांवर दोन क्रमांकावर ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या जागा त्या पक्षाला मिळाव्यात, अशी भूमिका काँग्रेसने घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहतील, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. काँग्रेसच्या या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला 106 आणि राष्ट्रवादीकडे 95 जागा जातील. तर उरलेल्या 87 जागांच्या वाटपावर मित्रपक्षांसह चर्चा होऊ शकते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी 2009 मधील विधानसभा निवडणूक आव्हानात्मक असल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 174 तर राष्ट्रवादीने 114 जागा लढवल्या होत्या. मात्र, 2014 मध्ये हे दोन्ही पक्ष वेगळे लढले होते आणि त्यांना सत्ता गमवावी लागली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT