Reservation Draw
Reservation Draw Sakal
महाराष्ट्र

पुण्यासह नऊ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद खुले; आरक्षण सोडत जाहीर

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.

पुणे - पुणे जिल्हा परिषदेसह राज्यातील नऊ जिल्हा परिषद अध्यक्षांचे पद हे खुले झाले आहे. याशिवाय राज्यातील १६ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद हे विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीनंतर राज्यातील १६ जिल्हा परिषदांवर महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीत जाहीर झालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी ही जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीनंतर होणाऱ्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून केली जाणार आहे. हे आरक्षण अडीच वर्षे कालावधीसाठी असणार आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुले झाले आहे. पाच वर्षाच्या कालखंडानंतर पुणे जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्ष हे खुल्या गटातून निवडले जाणार आहे. माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर यंदा पहिल्यांदाच हे पद खुले झाले आहे.

राज्यात एकूण ३४ जिल्हा परिषदा आहेत. यापैकी नऊ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद खुले झाले असून अन्य नऊ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे. विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेल्या १६ जिल्हा परिषद अध्यक्षांपैकी अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील महिलांसाठी दोन, अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातील महिलांसाठी दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) संवर्गातील महिलांसाठी तीन आणि सर्वसाधारण महिलांसाठी नऊ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद हे राखीव झाले आहे.

आरक्षण जाहीर करण्यात आलेल्या एकूण जिल्हा परिषदांपैकी ठाणे, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्हा परिषदांचे अध्यक्षपदे हे सध्या लागू असलेल्या आरक्षणाचा कालावधी संपल्यानंतर व पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या सहा जिल्हा परिषदांच्या उर्वरित कालावधीकरिता आणि उर्वरित २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांचे आरक्षण हे आगामी पंचवार्षिक निवडणूक झाल्यापासून अडीच वर्षे कालावधीसाठी लागू असेल, असे प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रात नमूद करण्यात आले आहे.

झेडपी अध्यक्षांचे संवर्गनिहाय नवे आरक्षण

  • खुला गट - पुणे, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, औरंगाबाद, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ.

  • महिला (खुले) - नाशिक, धुळे, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, अकोला.

  • अनुसूचित जाती (एस. सी.) - बीड, परभणी.

  • अनुसूचित जाती (महिला) - वर्धा, चंद्रपूर.

  • अनुसूचित जमाती (एस. टी.) - पालघर, नगर, नागपूर. .

  • अनुसूचित जमाती (महिला) - भंडारा, नंदूरबार.

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - सोलापूर, जालना, नांदेड, गोंदिया.

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - रत्नागिरी, सातारा, गडचिरोली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT