महाराष्ट्र

Loksabha 2019: काँग्रेसच्या नवव्या यादीतही पुण्याचा उमेदवार नाही; राजीव सातव यांना वगळले

सकाळन्यूजनेटवर्क

चंद्रपूर- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आज (रविवार) नववी यादी जाहीर केली. या यादीत पुण्याचा उमेदवार मात्र जाहीर करण्यात आलेला नाही. तर राजीव सातव यांना हिंगोलीतून वगळण्यात आले आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात आणखी चार उमेदवारांची घोषणा केली असून हिंगोलीतून सुभाष वानखेडे, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर, रामटेकमधून किशोर गजभिये तर अकोल्यातून हिदायत पटेल या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव आणि मुकुल वासनिक हे निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर चंद्रपूरमध्ये विनायक बंगाडेऐवजी सुरेश धानोरकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा यापूर्वी केली होती. त्यानंतर आज पक्षाने नववी यादी जाहीर केली. यामध्ये चंद्रपूर येथून विनायक बंगाडेऐवजी सुरेश धनोरकर तर हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने देशभरातील १० लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. यापूर्वी चंद्रपूर मतदारसंघातून विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु, नव्या यादीत त्यांची उमेदवारी रद्द केली असून त्यांच्याजागी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले सुरेश धानोरकर यांना या मतदारसंघातून उमदेवारी देण्यात आली आहे. धानोरकर हे भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना लढत देतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT