now we can not say Jaibhim in Regiment ex servicemen of mahar regiment complain to jitendra awhad  
महाराष्ट्र बातम्या

'आता रेजिमेंटमध्ये आम्हाला जय भीम म्हणता येत नाही'; जवानांची आव्हाडांकडे तक्रार

सकाळ डिजिटल टीम

महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला त्यानिमित्त आज 95 वा चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा करण्यात आला, यादरम्यान भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंटच्या माजी जवानांची गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे भेट घेतली. यावेळी रेजिमेंटच्या माजी अधिकाऱ्यांनी व जवानांनी महाड येथे "रेजिमेंटमध्ये आम्हाला जय भीम म्हणता येत नाही" अशी तक्रार केल्याचे आव्हाड यांनी सांगितले

जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत त्यांच्या सोशल मिडियावर जवानांसोबतचा फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, "महार रेजिमेंट ही भारतीय सैन्य दलातील एक प्रमुख रेजिमेंट आहे. त्याच्या स्थापनेच श्रेय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आज त्या रेजिमेंटच्या माजी अधिकाऱ्यांची व जवानांची महाड येथे भेट घेतली". या भेटीदरम्यान माजी सैनिकांनी आव्हाड यांच्याकडे रेजिमेंटमध्ये आता त्यांनी 'जय भीम' म्हणता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

आव्हड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्या माजी जवानांशी चर्चा करत असताना,"आता रेजिमेंटमध्ये आम्हाला जयभीम म्हणता येत नाही,"अशी तक्रार त्यांनी केली. यावर पुढे आव्हाड म्हणाले की, "जयभीम ही एक क्रांतिकारी ऊर्जा देणारी घोषणा आहे. त्याच्यावर बंदी का आणली..? हा प्रश्न आम्ही भारतीय लष्कराचे प्रमुख व संरक्षण मंत्र्यांना विचारणार आहोत." असे देखील त्यांनी सांगितले.

आज चवदार तळे सत्याग्रहाला 95 वर्ष पुर्ण झाले असून हा दिवस महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला होता. त्यानंतर हा दिवस ‘समता दिन’ तसेच ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणूनही साजरा केला जातो, हा दिवस समाजातील बऱ्याच घटकांसाठी ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thar Accident सोमवारी पुण्याहून कोकणात जायला निघाले, गुरुवारी ताम्हिणी घाटातल्या दरीत थारसह ६ मृतदेह दिसले; कधी आणि काय घडलं?

भारतीय जवानाचं शिरच्छेद करून मुशर्रफसमोर ठेवलं, काय आहे किस्सा? ‘धुरंदर’मध्ये अर्जुन रामपाल साकारणार त्या राक्षसाचा चेहरा

Chief Minister Security : कोणत्या मुख्यमंत्र्यांना आहे जबरदस्त सुरक्षा कवच अन् जाणून घ्या, नितीश कुमारांची सुरक्षा कशी?

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात मोटार खोल दरीत कोसळली, चार मृतदेह हाती; मृतांची नावे समोर, सर्वजण पुण्यातील

Latest Marathi News Update LIVE : अमरावतीत काँग्रेसची आढावा बैठक; तीनही नगरपरिषद जिंकण्याचा कार्यकर्त्यांचा निश्चय

SCROLL FOR NEXT