Temperature
Temperature 
महाराष्ट्र

राज्यात ‘ऑक्‍टोबर हीट’ वाढली

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात ‘ऑक्‍टोबर हीट’ वाढली असून, प्रमुख २७ पैकी १२ शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने पस्तिशी ओलांडली आहे. सर्वाधिक कमाल तापमान अमरावती येथे ३७.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानात २.१ अंश सेल्सिअसने वाढ होऊन ते ३३.८ अंश सेल्सिअस नोंदल्याची माहिती हवामान खात्यातर्फे रविवारी देण्यात आली. 

राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पडणाऱ्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे दिवसाच्या तापमानात पुन्हा वाढ होत असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले आहे.

राज्यात रविवारी दिवसभर उन्हाचा चटका जाणवत होता, त्यामुळे कमाल तापमानात वाढ नोंदली गेली. यामुळे २७ पैकी १२ शहरांमध्ये कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदले गेले. अमरावती, जळगावमध्ये ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. पुढील चोवीस तासांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून, तापमानातील वाढ कायम राहण्याची 
शक्‍यता आहे. 

सरासरी तापमानात वाढ
‘ऑक्‍टोबर हीट’चा चटका वाढला असतानाच, गेल्या आठवड्यात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. उर्वरित राज्यातही अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. त्यामुळे कमाल तापमानात घट होऊन पारा ३५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला, तर १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेले रात्रीचे तापमान पुन्हा १६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. दोन दिवसांपासून राज्यात आकाश निरभ्र होत असून, तापमान सरासरीच्या वर गेले आहे, असे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT