Indu Mill in Mumbai
Indu Mill in Mumbai 
महाराष्ट्र

इंदूमिल वरून सरकारवर चौफेर टीका

गोविंद तुपे

सरकार उघडे पडल्याची विरोधकांची टीका 

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देण्यात आलेल्या एकूण 12 एकर जागे पैकी फक्त सात एकर जागेवरच बांधकाम करता येणार आहे या 'सकाळ'च्या बातमीनंतर सरकारच्या भूमिकेवर सर्वच स्तरातून चौफेर टीका होऊ लागली आहे. त्यामुळे गांगरलेल्या एमएमआरडीएने इंदू मिलच्या सुंपुर्ण 12 एकर जागेवर बांधकाम प्रस्तावित असून बांधकाम करण्यास कुठलेही अडथळे नसल्याची माहिती एका पत्रकात दिली आहे. मात्र पाच एकर जागेवरील सीआरझेडच्या आरक्षणाबाबत या पत्रकात एका शब्दाचाही उल्लेख केलेला नाही. 

चैत्यभूमी लगतच्या इंदूमिलच्या संपुर्ण 12 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानतंर संपूर्ण कायदेशीर प्रक्रियाही पुर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इरानी आणि रामदास आठवले यांनी जाहीर कार्यक्रमात दिली. तरीदेखील कायद्यावर बोट ठेवत नगरविकास खात्याने पाच एकर जागेवर टाकलेल्या सीआरझेडच्या आरक्षणावरून आंबेडकरी अनुयायी संतापले आहेत. सरकारने याबाबत तात्काळ ठोस भूमिका घेतली नाही तर आंदोलनाचा इशाराही विविध संघटनांनी दिला आहे. 

सरकारचं अपयश उघड 
सरकारच्या ताब्यात भूखंड नसतानाही सरकारने भूमिपूजनाचा घाट घातला. बिहारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावरूनच सरकारचे अपयश लक्षात येते आहे. त्यामुळे आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे घडले ते शिवाजी महारांजांच्या बाबतीत घडू नये. 
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा 

हा तर सरकारचा खोटारडेपणा 
राजकारण डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांना आणून भूमिपूजन करायचे. आणि प्रत्यक्षात मात्र काहीही काम करायचे नाही. जमिनीच्या बाबतीतही सरकारने केलेली लोकांची दिशाभूल सकाळ माध्यम समुहाने आज समोर आणली आहे. यावरूनच या बेगडी सरकारचे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती किती प्रेम आहे हे स्पष्ट होते आहे. 
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद 

यावर सावध पवित्रा घेत संपूर्ण जागेवर बांधकाम करता येणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवटकर यांनी लेखी पत्रकात दिली आहे. मात्र पाच एकर जागेवरील सीआरझेडच्या आरक्षणाबाबत फोनवरून विचारले त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. 

नगरविकास खात्याच्या परिपत्रकाविरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने एमएमआरडीएच्या आयुक्तांची भेट घेऊन इंदू मिलची संपूर्ण 12 एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT