4aag_902.jpg
4aag_902.jpg 
महाराष्ट्र

दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांचा 'आक्रोश' ! थकीत वेतनासह दिवाळीची भेटीची मागणी 

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांचे वेतन द्यावे आणि दिवाळीनिमित्त महागाई भत्ता व सण उचल जाहीर करावी, या मागणीसाठी राज्यभर आज निवेदने दिली. मात्र, वारंवार मागणी करुनही प्रशासन तथा राज्य सरकारकडून काहीच तोडगा निघत नसल्याने त्यांनी आता 9 नोव्हेंबरला स्वत:च्या घरासमोर कुटुंबासह आक्रोश आंदोलन करण्याचे निश्‍चित केले आहे.

परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष 
कामगार कराराच्या तरतूदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता व सण उचल देणे आवश्‍यक आहे. मात्र, कामगारांना थकित वेतन, देय वेतन, वाढीव महागाई भत्ता व सण उचल मिळालेली नाही. याबाबत महामंडळाने तथा परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांनी तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र संघर्ष अटळ आहे, असाही इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.

अनलॉकनंतरही राज्यात कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या लक्षणीय राहिली आहे. तरीही जीवाची पर्वा न करता अडचणीतील परिवहन महामंडळाला बाहेर काढण्यासाठी एसटी कामगार ड्यूटी करीत आहेत. अनेकांचा मृत्यू होऊनही त्यांना 50 लाखांचे विमा कवच मिळालेले नाही. दुसरीकडे ऑगस्टपासून वेतन मिळालेले नाही. आता दिवाळी 13 नोव्हेंबरपासून सुरु होत असतानाही कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त दिली जाणारी भेट जाहीर झालेली नाही. त्यासाठी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केल्यानंतरही मदत मिळत नाही. अशा परिस्थितीत दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह घरासमोर आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, आज (सोमवारी) एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसिलदार, स्थानिक लोकप्रतिनिधींना मागण्यांचे निवेदन दिले. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने तत्काळ तोडगा काढण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कामगार युनियनचे अध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने तथा राज्य सरकारने कोरोनाचे कारण दिले आहे. त्यामुळे कामगार संघटनेच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: नाशिकात ५ तर दिंडोरीत ६ उमेदवारी अर्ज बाद

SCROLL FOR NEXT