पावतीद्वारे एक कोटी 40 लाखांची देणगी पंढरपूर - आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात यंदा 39 लाख 55 हजार 508 रुपयांची वाढ झाली आहे. प्रामुख्याने देणगी पावत्यांच्या माध्यमातून उत्पन्नवाढ झाली आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली आणि व्यवस्थापक विलास महाजन यांनी दिली. आषाढी यात्रेच्या 24 जून ते 9 जुलै या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने देणगी गोळा करण्यासाठी आणि देणगीदारांना रीतसर पावती देण्यास जादा स्वयंसेवकांची व्यवस्था केली होती. त्यामुळे यंदा वाढ होऊन दोन कोटी 68 लाख 96 हजार 514 रुपयांचे उत्पन्न मिळाले. विविध प्रमुख माध्यमातून यंदा मिळालेले उत्पन्न (रुपयांत) श्री विठ्ठलाच्या चरणी जमा झालेली रक्कम - 42,51,589 श्री रुक्मिणी मातेच्या चरणी जमा झालेली रक्कम - 7,65,883 पावतीद्वारे जमा झालेली देणगी - 1,39,53,102 बुंदी लाडू प्रसाद विक्री - 33,5,120 राजगिरा लाडू विक्री - 6,50,300 फोटो विक्री - 91,200 महानैवेद्य मुदतठेव जमा - 75,000 मनिऑर्डर - 39,617 साडी विक्री - 68,650 नित्यपूजा - 25,000 या शिवाय भक्त निवास, अन्नछत्र कायम ठेव, गो-शाळा देणगी, हुंडी पेटी, ऑनलाइन देणगी, विठ्ठल विधी उपचार या माध्यमातून समितीला मिळणाऱ्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. |