महाराष्ट्र

आता अपमान सहन करायचा नाही; भाजपमध्येच जायंच!

मनोज गायकवाड

अकलूज : अपमान सहन करायचा नाही. घुसमट सहन करायची नाही. आता भाजपचे चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे, असा निर्धार मोहिते-पाटील समर्थक येथे व्यक्त करीत आहेत. बदलत्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा याबाबत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त केला जात आहे.

मोहिते पाटलांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या या बैठकीला मोहिते-पाटील समर्थकांची मोठी गर्दी झाली. मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करावा, असा दबाव वाढला आहे. या बैठकीला नुकतीच सुरवात झाली असून, कार्यकर्ते आपली भूमिका स्पष्ट करीत आहेत. मोहिते-पाटलानी भाजपमध्ये प्रवेश करावा आणि भाजपची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्ते करीत आहेत. यावेळी बोलताना शिवामृत दूध संघाचे संचालक हरीभाऊ मगर म्हणाले, मोहिते पाटील विद्यमान खासदार असताना त्यांनी येथे पवारांसाठी शांत राहायचा निर्णय घेतला. पवारांच्या उमेदवारीचे स्वागत केले असे असताना पवारानी माघार का घेतली?

विद्यमान तीन खासदारांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, मोहिते पाटलांची उमेदवारी जाहीर केली नाही. मावळमधून पार्थची उमेदवारी जाहीर केली मग रणजितसिंहाची का केली नाही. दादा आता निर्णय घ्या. लोकांच्या मनातील भावना ओळखून निर्णय घ्या.

गणपत वाघमोडे म्हणाले, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घ्यायची लाज वाटू लागलीय. मोहिते-पाटील काय आहेत हे राज्याने पाहिले आहे. समोरच्याची अक्कल कशी लूज करायची हे मोहिते पाटलांना चांगले माहीत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा अध्यक्ष वजीर शेख यानी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी राजीनामे देऊन मोहिते पाटलांसमवेत जाणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन धाईंजे सहकार महर्षि कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, अल्ताफ अख्तराज पटेल यांनीही आपल्या भावना व्यक्त व्यक्त केल्या.

या बैठकीला खासदार मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, राजसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, धैर्यशिल मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यासह मोहिते-पाटील परिवारातील सदस्य उपस्थित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT