मुंबई - ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
मुंबई - ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. 
महाराष्ट्र

‘मोदींवरील चित्रपट युवकांसाठी प्रेरणादायी’

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या चित्रपटातून राजयोगी व्यक्तित्व असलेल्या वैश्विक नेत्याचे जीवन जगासमोर येणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले. लिजंड ग्लोबल स्टुडिओ प्रस्तृत ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. 

या कार्यक्रमाला चित्रपटाचे निर्माते व अभिनेते सुरेश ओबेरॉय, संदीप सिंग, चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेता विवेक ओबेरॉय आणि दिग्दर्शक ओमंग कुमार उपस्थित होते. या चित्रपटाचे पोस्टर एकाच वेळी तेवीस भाषांत प्रदर्शित होणार आहे.

या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, की भारताने पंतप्रधान मोदी यांच्या रूपाने या युगातील वैश्विक असे नेतृत्व जगाला दिले आहे. त्यामुळे असा चित्रपट बनविणे हासुद्धा एक मोठा विचार आहे. भारतातील युवा पिढीकडे मोठी क्षमता आहे. पण त्यांना गरज आहे, ती प्रेरक जीवन दर्शनाची. मोदी यांनी गरिबीतून येऊन संघटन कौशल्याच्या बळावर चहा विक्रेता ते मोठा राजकीय नेता ते पंतप्रधानपद अशा वाटचालीतून युवा पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. त्या अर्थाने ते राजयोगी आहेत. त्यांच्यामध्ये राजा आणि योगीत्व, असा संयोग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT