Solapur neurosurgeon Dr. Shirish Valsangkar’s suicide case esakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिसांनी दाखल केले ७२० पानांचे दोषारोपपत्र! अटकेतील मनीषा मुसळे मानेवरच पोलिसांचा ठपका; दोषारोपपत्रात ‘या’ ठळक बाबी...

कोट्यवधी रुपयांचे मालक असलेले प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी मोदी परिसरातील राहत्या घरातील बाथरूममध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेस अटकेतील संशयित आरोपी मनीषा माने मुसळे याच कारणीभूत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : कोट्यवधी रुपयांचे मालक असलेले प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी मोदी परिसरातील राहत्या घरातील बाथरूममध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेस अटकेतील संशयित आरोपी मनीषा माने मुसळे याच कारणीभूत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी गुन्ह्याचे ७२० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असून त्यावर आता सुनावणी सुरू होणार आहे.

कौटुंबीक कलहाचा सामना करणाऱ्या डॉ. शिरीष वळसंगकर यांना १७ एप्रिल रोजी त्यांच्या रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा यांनी दोन पानी ई-मेल केला. तोच ई-मेल डॉ. शिरीष यांची पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन व सून डॉ. शोनाली यांनाही पाठविला होता. त्याच दिवशी दुपारी पावणेपाच व सायंकाळी सव्वापाच या वेळेत ५६ मिनिटे मनीषा यांनी डॉ. शिरीष यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती. १८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आणि सव्वासातच्या सुमारास डॉ. शिरीष यांनी मुलगा डॉ. अश्विन यांना आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल भेटून व फोनवरून माहिती दिली होती. ‘मनीषा मुसळे हिच्यामुळे होणारा त्रास मी विसरू शकत नाही, सहनही करू शकत नाही. त्यामुळे मी माझे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला आहे.’ असे ते म्हणाल्याचे डॉ. अश्विन यांनी जबाबात सांगितले आहे.

मनीषा हिची रुग्णालयातील अरेरावी व पैशांचा गैरव्यवहार समजल्यावर डॉ. शिरीष यांनी डिसेंबर २०२४ पासून तिचे अधिकार कमी केले होते. त्यामुळे चिडलेल्या मनीषाने डॉ. शिरीष यांना भेटून व फोनवरून सतत बदनामी व प्रतिमा मलिन करण्याची धमकी दिली. ई-मेल पाठवून मुलांना मारून स्वत: रुग्णालयासमोर जाळून घेऊन आत्महत्या करण्याचीही धमकी दिली होती, असे पोलिसांनी त्यांच्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. आता मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे त्या दोषारोपपत्राचा अभ्यास करून सुनावणीवेळी न्यायालयात बाजू मांडतील. न्यायालयाच्या सुनावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, उद्या (मंगळवारी) मनीषाच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे.

डॉक्टर देणार होते पोलिसांत फिर्याद, पण...

आत्महत्येच्या आदल्या दिवशी रूग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा माने मुसळे या डॉ. शिरीष वळसंगकर यांना दोनदा भेटल्या होत्या. मनीषाच्या धमकीमुळे डॉ. वळसंगकर हे १९ एप्रिल रोजी पोलिसांत फिर्याद देणार होते. पण, १७ वर्षे ज्या व्यक्तीला सांभाळले, प्रशासकीय अधिकारी केले, तिने दिलेला मानसिक त्रास सहन न झाल्याने डॉ. शिरीष यांनी १८ एप्रिल रोजी गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सुसाईड नोटवरून मतमतांतरे...

डॉ. शिरीष यांच्या कपड्यात कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे सुरवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानंतर मृतदेहाच्या उत्तरीय चाचणीवेळी डॉक्टरांच्या अंगावरील कपड्यांची पंचासमक्ष झडती घेताना पॅन्टच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याचे पोलिसांनीच सांगितले. मात्र, घटनेच्या दिवशीच उपचारावेळी डॉक्टरांच्या अंगावरील कपडे काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी १९ एप्रिलला ती सुसाईड नोट सापडली. दुसरीकडे डॉ. शिरीष यांच्या ‘सीडीआर’मधून त्यांनी १७ व १८ एप्रिल रोजी कोणाकोणाला संपर्क केला हे समजले, पण त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले हे समोर आलेले नाही. कारण, डॉक्टरांच्या महागड्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगचे ऑप्शनच नव्हते.

ठळक बाबी...

  • तपासाचे एकूण दिवस : ५८

  • एकूण साक्षीदार : ७३

  • जप्त केलेल्या वस्तू : १९

  • जप्त केलेली कागदपत्रे : १०८

  • दोषारोपपत्र : ७२० पाने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT