Police Bharti  sakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिस भरतीची लेखी परीक्षा रविवारी! सकाळ ८ वाजताच यावे लागणार केंद्रावर; 'ही' कागदपत्रे जवळ ठेवा, नाहीतर...

रविवारी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षेत सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ असतील. पण, उमेदवारांना सकाळी आठ वाजताच परीक्षा केंद्रावर हजर राहायचे आहे. उमेदवारांनी हाॅल तिकीट सोबत आणायचे आहे. मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना दिलेले ओळखपत्र देखील सोबत असावे. प्रत्येकांनी दोन पासपोर्ट साईज फोटो आणावेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर पोलिस दलातील ७३ पदांसाठी रविवारी (ता. १५) लेखी परीक्षा होणार आहे. अक्कलकोट रोडवरील एसव्हीसीएस हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ही परीक्षा होणार आहे. ८८६ उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. ग्रामीण पोलिस दलातील ९० पदांसाठी एक हजार ४४ उमेदवार लेखी परीक्षा देतील. त्यांची परीक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोरील अभियांत्रिकी कॉलेज येथे होणार आहे. राज्यभरातही लेखी परीक्षा त्याच दिवशी होणार आहे.

रविवारी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षेत सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ असतील. पण, उमेदवारांना सकाळी आठ वाजताच परीक्षा केंद्रावर हजर राहायचे आहे. उमेदवारांनी हाॅल तिकीट सोबत आणायचे आहे. मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना दिलेले ओळखपत्र देखील सोबत असावे. प्रत्येकांनी दोन पासपोर्ट साईज फोटो आणावेत. याशिवाय उमेदवारांना कार्यालयाकडून पॅड व काळे पेन देण्यात येणार आहेत.

त्यांनी स्वत:हून पेन, पेन्सिल, खोडरबर, मोबाईल, डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मायक्रो कॅमेरा, स्मार्ट वॉच, स्मार्ट आय ग्लासेस अशी कोणतीही वस्तू आणू नये. सर्वांची अंगझडती घेऊन आत सोडले जाणार असल्याने त्यांनी आठ वाजताच केंद्रावर हजर राहायचे आहे. उशिरा येणाऱ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. कोणी कॉपी किंवा गैरप्रकार करताना आढळल्यास त्याच्यावर महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) कायदा २०२४ नुसार कारवाई होईल, असा इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.

७३ पदांसाठी ८८६ उमेदवारांची लेखी

सोलापूर शहर पोलिस दलातील ७३ पोलिस पदांसाठी सध्या भरती सुरू आहे. ११ ते १४ फेब्रुवारी या काळात उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडली. त्यात यशस्वी ठरलेल्यांच्या गुणवत्ता यादीतून एका पदासाठी १० उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसाठी करण्यात आली आहे. पण, तब्बल १५६ उमेदवारांना एकसमान गुण मिळाल्याने त्यांनाही लेखी परीक्षेची संधी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ryan Rickeltonने इतिहास रचला! जयसूर्या, तेंडुलकर यांचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला...

Mumbai: मुंबई विद्यापीठ आखाडा नाही! भदंत विमांसा यांना उच्च न्यायालयाचा इशारा

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...; पाहा कुठे काय घडलं?

दाभोलकर हत्या प्रकरणी कळसकर हल्लेखोर असल्याच्या साक्षीदारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाला मंजुरी, तब्बल ३ कोटींचा खर्च; पण रखडलेली देखभाल आणि 'गृहप्रवेशा'बाबत प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT