Mumbai: महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाला मंजुरी, तब्बल ३ कोटींचा खर्च; पण रखडलेली देखभाल आणि 'गृहप्रवेशा'बाबत प्रश्नचिन्ह

Mumbai Mayor Bungalow Renovation: महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र मागील ४ वर्षांपासून हा बंगला बंद राहिल्याने त्याच्या अवस्थेबाबत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रशासनावर टीका केली जात आहे.
Mumbai Mayor Bungalow

Mumbai Mayor Bungalow

ESakal

Updated on

​मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेतील ऐतिहासिक महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाच्या ३ कोटी ४८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला अखेर स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा बंगला वापराविना बंद राहिल्याने त्याच्या अवस्थेबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सदस्य रमाकांत रहाटे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच एवढा मोठा खर्च करण्याची वेळ आल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com