dhananjya munde on pooja chavan suicide reaction
dhananjya munde on pooja chavan suicide reaction 
महाराष्ट्र

पूजा चव्हाण प्रकरणावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील बहुचर्चित पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज, पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत त्यांनी मीडियाशी संवाद साधला. धनंजय मुंडे ज्या मतदारसंघातील आमदार आहेत. त्याच परळी मतदारसंघाची पूजा मूळची रहिवासी आहे. टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूजाने पुण्यात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती.

काय म्हणाले धनंजय मुंडे?
पूजाच्या आत्महत्येचे महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या एका मंत्र्याशी घनिष्ट संबंध असल्याच्या चर्चेने सध्या राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झालं आहे. माध्यमांशी बोलताना मुंडे म्हणाले, "माझ्या मतदारसंघातील ती भगिनी आहे. तिनं आत्महत्या केल्यानंतर जे वावटळ निर्माण झालं आहे त्याचा पोलीस पूर्णपणे तपास करत आहेत, पोलिसांचा तपास पूर्ण होऊ द्या. त्यानंतर सर्वकाही समोर येईल. ही पूर्णपणे आत्महत्या असल्याचं तुम्हाला देखील माहिती आहे. उलट प्रसारमाध्यमांनी देखील याबाबत प्रश्न विचारायला हवेत. माझं म्हणणं एवढचं आहे की यातून सर्व गोष्टी पूर्णपणे समोर येऊ द्यात.'

कोण होती पूजा चव्हाण?
पूजा ही मूळची बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी होती. टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली पूजा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह होती. बंजारा समाजाची असल्याने समाजाच्या विविध कार्यक्रमांमध्ये तिची कायम हजेरी असायची. बड्या राजकीय नेत्यांसोबत तिचे अनेक फोटोही समोर आले आहेत. राज्यातील बड्या नेत्यांसोबतचे तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
तसेच त्यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्टही केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ती बीडवरुन इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. त्यानंतर पुण्यात वानवडी भागात राहत असलेल्या पूजाने राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती त्यावरुन या आत्महत्येशी शिवसेनेच्या मंत्र्याचा संबंध असल्याचं बोललं जात आहे.

आणखी वाचा - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT