Pooja Khedkar news  esakal
महाराष्ट्र बातम्या

Pooja Khedkar: पूजा खेडकरांनी धुडकावली पुणे पोलिसांची नोटीस? जबाब नोंदवण्यासाठी अद्याप वाशिममधून पुण्याकडं रवाना नाही

ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या आपल्या वादग्रस्त कारनाम्यांमुळं सध्या चांगल्याच गोत्यात आल्या आहेत.

सकाळ ऑनलाईन

पुणे : ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या आपल्या वादग्रस्त कारनाम्यांमुळं सध्या चांगल्याच गोत्यात आल्या आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर त्यांनी नुकतेच आरोप केले होते. यासंदर्भात लेखी जबाब नोंदवण्यासाठी आज पुण्यात उपस्थित राहण्याची नोटीस त्यांना पुणे पोलिसांनी दिली होती.

पण अद्याप त्या वाशिममध्येच असल्याचं सुत्रांकडून कळतंय, त्यामुळं पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Pooja Khedkar defied orders of Pune Collector there is no departure from Washim)

साम टीव्हीच्या माहितीनुसार, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांप्रकरणी लेखी जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. हा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना पुण्यात लेखी जबाब नोंदवणं गरजेचं होतं. पूजा खेडकर यांची सध्या वाशिम इथं प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी काल रात्रीच वाशिम इथून पुण्याकडं रवाना होणं अपेक्षित होतं. पण त्या अद्याप वाशिममध्येच आहेत. त्यांनी पुण्याला जाण्यासाठी कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळं आता त्या पुणे पोलिसांसमोर जबाब नोंदवण्यासाठी हजर राहतात का? याबाबत साशंकता आहे.

दरम्यान, त्यांना जर प्रत्यक्ष पुण्यात हजर रहायचं नसेल किंवा हजर राहणं शक्य नसेल तर जबाब नोंदवण्यासाठी वेळ मागून घेण्याची किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलिसांसमोर जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT