महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर  तोडगा निघण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (ता. 23) दुपारी 3 वाजता व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकाला कामगार संघटनांचे अध्यक्ष उपस्थित राहणार असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघण्याची शक्‍यता आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ, जानेवारी महिन्यांपासून 3 टक्के महागाई भत्ता आदी प्रलंबित मागण्यांवर अद्याप तोडगा निघाला नाही. शिवाय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, दिवाळीपूर्वीचे वेतन अद्याप कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. त्यानिषेधार्थ एसटीच्या मान्यताप्राप्त राज्य एसटी कामगार संघटनांसह इतर कामगार संघटनांनी 25 ऑक्‍टोबरला एसटीच्या सर्व विभागीय कार्यालय आणि मध्यवर्ती कायर्शाळेसमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ऐन दिवाळीच्या हंगामात एसटी सेवा विस्कळित होण्याची शक्‍यता होती. अखेर एसटी महामंडळाने प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. 

मात्र या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा न निघाल्यास 25 ऑक्‍टोबरला कर्मचारी निदर्शेने करण्यावर ठाम असल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT