tiwari.jpg
tiwari.jpg 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : 'प्रफुल्ल पटेल यांना कधीही अटक होण्याची शक्यता'

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकासकामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत , आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे, आजच्या एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीमध्ये पीएमसी बँक ही प्रफुल्ल पटेल यांची असून, त्यांना या घोटाळ्यात अटक होण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी कल्याण पूर्वमधील प्रचार सभेत केले . 

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ मंगळवार ता 15ऑक्टोबर रोजी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक समोरील मैदान मध्ये प्रचार सभा आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रवक्ता श्वेता शालिनी, जगन्नाथ पाटील, उमेदवार गणपत गायकवाड, नाना सुर्यवंशी, मनोज राय आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी खासदार मनोज तिवारी यांनी नरेंद्र मोदी यांच्यामुळे राजकारणामध्ये कसा आलो आणि जनतेची सेवा कशी करतो याचा दाखला देत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. देशात आणि राज्यात भाजपचे सरकार असून, जनतेची कामे विकास पूर्ण झाले असे आम्ही कधी सांगणार नाही पण देश आणि राज्य विकासाच्या दिशेने जात असल्याचे सांगत मोदी हे गरीब घरातील मुलगा असून, फडणवीस हे देखील सर्वसामान्य घरातून आले आहेत. त्यांना सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या माहीत आहे. ते दिवस रात्र विकासकामे पूर्ण करण्याच्या दिशेने जात असताना मात्र विरोधी पक्षातील नेते घोटाळे करण्यात मग्न असल्याचा आरोप यावेळी तिवारी यांनी केला.

आज एका इंग्रजी वृत्त वाहिनी च्या बातमीचा दाखला देत तिवारी पुढे म्हणाले की, पीएमसी बँक ही प्रफुल्ल पटेल यांची असून, त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट केला, नागरिकांनी बँकेत पैसे भरण्यापूर्वी ही बँक राष्ट्रवादी नेत्यांची बँक नाही ना याची काळजी घ्यावी आणि सरकारी बँकेत पैसे जमा करावे असे आवाहन दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी कल्याण पूर्वेत मधील प्रचार सभेत केले.

यावेळी मनोज तिवारी आपल्या भाषणात हिंदी आणि भोजपुरी भाषेत भाषण करता करता एक दोन भोजपुरी गाणे गाऊन उपस्थित उत्तर भारतीय बांधवांचे मनोरंजन करत उमेदवार गणपत गायकवाड यांना विजयी करण्याचे भावनिक आवाहन करत त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT