महाराष्ट्र

प्रफुल्ल पटेल 'ईडी' कार्यालयात हजर; चौकशी सुरु

वृत्तसंस्था

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले. गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याच्या संशयातून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे.

दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियर्ड परिसरातील कार्यालयात पटेल यांची चौकशी सुरु आहे. पटेल यांनी सीजे हाउसमधील इक्बाल मिर्चीच्या मालकीचे दोन फ्लॅट विकत घेतल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. याप्रकरणी अटक केलेल्या हरुण युसूफ व रणजीत सिंग बिंद्रा दलालांची चौकशी करण्यात आली. या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. त्या संशयातूनच प्रफुल्ल पटेल यांची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्यादरम्यान पटेल यांची चौकशी केली जात असल्याने याचे राजकीय पडसाद कुठंही उमटू नये, याबाबत पोलिस आणि संबंधित प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT