Manoj Jarange on Prakash Ambedkar Vanchit  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रकाश आंबेडकरांचा सूर का बदलला? कुणबी दाखले तातडीने थांबवण्याची मागणी

बुधवारी वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न झाली, या बैठकीमध्ये तब्बल ११ ठराव घेण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं तातडीने थांबवावं, असा एक ठराव बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच सगेसोयऱ्याच्या अध्यादेश रद्द करावा, कारण तो कायद्याला धरुन नाही.. असाही ठराव घेण्यात आलेला आहे. वंचितने याबाबतची माहिती दिली आहे.

संतोष कानडे

Prakash Ambedkar on Manoj Jarange : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कायम मनोज जरांगे यांच्या चळवळीला साथ दिलेली आहे. मात्र आता अचानक प्रकाश आंबेडकर यांचा सूर बदलल्याचं दिसून येतंय. वंचित आघाडीच्या बैठकीमध्ये ११ वेगवेगळे ठराव घेण्यात आले. यामध्ये प्रामख्याने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं तातडीने थांबवा, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अशी प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीपासून भूमिका घेतलेली आहे. मागच्या वर्षभरापासून त्यांनी सातत्याने मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिलेला होता. छगन भुजबळ यांनी नेहमी साद घालूनदेखील प्रकाश आंबेडकर बधले नव्हते. मात्र आता आंबेडकरांचा वेगळा सूर दिसून येत आहे.

बुधवारी वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न झाली, या बैठकीमध्ये तब्बल ११ ठराव घेण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं तातडीने थांबवावं, असा एक ठराव बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच सगेसोयऱ्याच्या अध्यादेश रद्द करावा, कारण तो कायद्याला धरुन नाही.. असाही ठराव घेण्यात आलेला आहे. वंचितने याबाबतची माहिती दिली आहे.

मायक्रो ओबीसींसाठी रोहिणी आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी करावी, गरीब मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेला पाठिंबा; मात्र ते देत असताना ओबीसींचा कोटा स्वतंत्र राहिला पाहिजे, ओबीसींच्या कोट्यातून मराठांना आरक्षण देता येणार नाही. अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांवर आपण नाराज नाहीत, असं जरांगेंनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राज्यामध्ये ओबीसी आंदोलनाने जोर धरला असून दहा दिवस उपोषण केल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. ओबीसी आंदोलनाला मिळालेल्या पाठिंब्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा सूर बदलला का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAN 2.0 : नेमकी काय भानगड आहे 'PAN 2.0' ; आता नवीन कार्ड तयार करावं लागणार का?

ENG vs IND: कॅप्टन म्हणून पहिल्याच मालिकेत काय शिकलास? शुभमन गिलच्या उत्तराने जिंकली सर्वांची मनं; सिराजबद्दल म्हणाला...

Navnath Kudale : ‘आयटी’ सोडून तरुणाला दुग्ध व्यवसायाची गोडी; दररोज सरासरी ६० लिटर उत्पादन

VIRAL VIDEO: अरे हे काय? अजय देवगणचं पीक आलं! झाडीमागून येणाऱ्या ड्युप्लीकेट्सना पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा

Coconut Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला फटका! सणासुदीच्या काळात नारळाच्या किंमती वाढल्या, नवे दर काय ?

SCROLL FOR NEXT