Prasad Lad Chitra Wagh Sakal
महाराष्ट्र बातम्या

Prasad Lad : माझ्या भावाला मंत्रिपद मिळावं हीच इच्छा - चित्रा वाघ

बहिणीने आमदार खासदार व्हावं, अशी इच्छा प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीतला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. या भाऊबीजेनिमित्त बहिण भावाला ओवाळते. राजकारणातही काही बहिण-भावांच्या जोड्या आहेत. यापैकीच एक जोडी आहे ती म्हणजे भाजपामधले नेते प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांची. यानिमित्ताने भावाला मंत्रिपद मिळावं ही इच्छा चित्रा वाघ यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या २० वर्षांपासून हे दोघेही भाऊबीज साजरी करतात. यंदाही प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, "बहीण म्हणून माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. त्यांनी सेवाभावी वृत्तीने राजकारणात काम केलं आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्याचा समावेश व्हावा."

तर प्रसाद लाड यांनीही आपल्या भावना व्यक्त करत चित्रा वाघ खासदार किंवा आमदार व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रसाद लाड म्हणाले, "मला निश्चितपणे असं वाटतं की आमची ताई आमदार किंवा खासदार व्हावी. ही इच्छा मी पक्षनेतृत्वालाही सांगितली आणि तिचं काम तिला नक्कीच फळ देईल, याची मला खात्री आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT