महाराष्ट्र

सरनाईकांच्या ‘त्या’ पत्रामागे शिवसेनेचाच हात?

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून बाहेर आले असून त्यातील तपशीलाची पूर्वकल्पना शिवसेना नेत्यांना होती, असे विश्वसनीयरित्या समजते. युती तोडल्याने माझ्यासारख्या नेत्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो, हे पत्रात नमूद करून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर सरनाईकांनी दोषारोपण केले आहेच; शिवाय कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची कामे होत असून ते शिवसेनेला फोडत असल्याचा आरोपही केला आहे.

एका दगडात दोन पक्षी मारण्याचा हा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्वकल्पना देऊन झाला असून त्यांची या पत्राला पूर्णत: मान्यता असल्याचे समजते. ८ जूनला मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेले पत्र आज सही शिक्क्यानिशी बाहेर आले आहे. हा केवळ योगायोग नसून हे ‘सिलेक्टीव्ह लीक’ असल्याचे मानले जाते आहे. सरनाईक यांच्या मुलाचे लग्न भाजप नेते माजी मंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या मुलीशी झाले आहे. त्यामुळे भाजपशी सलगी वाढवण्याचा सल्ला त्यांच्याकडून येणे महत्वाचे मानले जाईल, अशी अटकळ आहे. ‘पुन्हा परत जाऊ’ या अशी हाक देतानाच, भाजप विरोधकांना त्रास देते, चौकशी मागे लावते, हेही स्पष्ट लिहिण्यात आले आहे. प्रताप सरनाईक तसेच पत्रात उल्लेखलेल्या रवींद्र वायकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासंबंधीची कागदपत्रे जाहीर करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमैया यांनी, अटक समोर दिसत असल्याने सरनाईकांनी ही विधाने केले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागून दिल्लीला जाणे, मतभेद विसरून राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांचे स्वत: अभिष्टचिंतन करणे या दोन दरी सांधण्याच्या घटनांनंतर लगेचच हे पत्र जाहीर चर्चेला आणणे हा स्वत: ठाकरे यांनीच उभा केलेला चकवा तर नव्हे, असा प्रश्न केला जातो आहे. पंतप्रधानांशी झालेल्या गुफ्तगूमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस विचलित झाले आहेत. आज सरनाईकांच्या पत्रात महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेनेला त्रास देत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. शिवसेना नेते या पत्राच्या बाहेर येण्याने बुचकळ्यात पडले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून पत्र बाहेर पडण्याची ठाकरेंच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT