raj bhawan
raj bhawan 
महाराष्ट्र

राजभवनात भूमीगत संग्रहालय; राष्ट्रपती करणार उद्घाटन 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या (शनिवार) होणार आहे.

राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या ‘जल भूषण’ या इमारतीच्या पुर्नबांधणीसाठी देखील भूमिपूजन केले जाणार आहे. राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांसाठी आरक्षित ‘जल किरण’ या नूतनीकृत अतिथीगृहाचे देखिल उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी होणार आहे.

गेल्या वर्षी राजभवन येथे आढळलेल्या ब्रिटीशकालीन जुळ्या तोफांची औपचारिक प्रतिष्ठापना ‘जल विहार’ या ऐतिहासिक वास्तूसमोर करण्यात आली असून राष्ट्रपतींच्या हस्ते त्या ठिकाणी कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे. राष्ट्रपतींचा आज आणि उद्या (रविवार) होणाऱ्या मुंबई दौऱ्याच्यावेळी हे उदघाटन होणार आहे.

राजभवनात १५ हजार चौरस फूट परिसरात असलेल्या राजभवनातील विस्तीर्ण भूमिगत बंकरमध्ये संग्रहालय निर्माण करण्यात आले असून ते लवकरच सामान्य नागरिकांसाठी खूले केले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन आरक्षण करावे लागणार आहे. भूमिगत बंकरमध्ये आभासी वास्तवतादर्शक (Virtual Reality) संग्रहालय तयार केले गेले असून त्यादवारे लोकांना गतकाळातील बंकरच्या वापराबाबत माहिती देण्यात येणार आहे.

भूमिगत बंकरविषयी थोडक्यात :
- तीन वर्षांपूर्वी राज भवनातील हिरवळीखाली भव्य ब्रिटीश कालीन बंकर असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना आढळले. त्यानंतर लगेचच राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह बंकरची पाहणी करून त्याचे जतन करण्याचे आदेश दिले होते.
- अनेक दशके या बंकरची वास्तू बंदिस्त असल्यामुळे दुर्लक्षित अवस्थेत होती तसेच सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे वास्तू स्थापत्य दृष्टीने कमजोर झाली होती.
- ही ऐतिहासिक वास्तू राजभवनाचा वारसा असल्यामुळे तसेच तिचे वरील बाजूस राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली ‘जलभूषण’ ही वास्तू उभी असल्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करणे तसेच लोकांना वास्तू पाहण्याची संधी देणे आवश्यक होते.
- या दृष्टीने भूमिगत बंकरच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडीट केले गेले व नंतर तिचे बळकटीकरण करण्यात आले. त्यानंतर बंकरमध्ये आभासी वास्तवदर्शी संग्रहालय करण्याचे ठरविण्यात आले.
- या बंकरमध्ये विविध आकारांचे १३ कक्ष असून बंकरच्या सुरुवातीला २० फूट उंच भव्य प्रवेशव्दार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रदीर्घ उतारा आहे.
- बंकरचा शोध लागला त्यावेळी त्यातील कक्षांना ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार (Cartridge Store), शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसुन आली होती. बंकरमध्ये पाण्याच्या निचऱ्याची तसेच शुध्द हवा व नैसर्गीक प्रकाशाची योग्य व्यवस्था असल्याचे आढळले. बंकरमध्ये जागोजागी दिव्यांसाठी जागा (Lamp Recess) ठेवण्यात आल्या होत्या. बंकरचे संवर्धन करताना त्यातील सर्व मूळ वैशिष्टे जतन करण्याची काळजी घेण्यात आली आहे.
- बंकरमध्ये आभासी वास्तव दर्शविणारे कक्ष तयार करण्यात आले असून त्यातून अभ्यागतांना तोफ चालविण्याचा आभासी अनुभव घेता येईल. राज्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास तसेच राजभवनाचा इतिहास देखील या ठिकाणी पाहता येणार आहे. तोफांच्या प्रतिकृती व त्रिमितीय जवानांच्या आकृती देखील याठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार

Game Of Thrones : 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; "त्यांच्याशिवाय जगणं मुश्किल.." पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

SCROLL FOR NEXT