IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

KKR and RR Points Table Scenario: आयपीएल 2024 मध्ये आठ विजय आणि 16 पाँइंट्स मिळवल्यानंतरही अद्यापही कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी का पात्र ठरलेले नाहीत.
Kolkata Knight Riders | Rajasthan Royals
Kolkata Knight Riders | Rajasthan RoyalsSakal

IPL 2024 Points Table: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मंगळवारी (7 मे) राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 20 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा राजस्थानचा आयपीएल 2024 मधील तिसराच पराभव होता. पण असे असले तरी अद्याप त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळालेलं नाही.

राजस्थानने आत्तापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर 3 सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे त्यांचे सध्या 16 गुण आहेत. राजस्थान सध्या पाँइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

पहिल्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघानेही 11 पैकी 8 सामने जिंकेल आहेत आणि 3 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचेही 16 गुण आहेत. साधारणत: 16 गुण मिळवलेला संघ बऱ्याचदा प्लेऑपमध्ये स्थान मिळवतो.

Kolkata Knight Riders | Rajasthan Royals
SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

त्याचमुळे राजस्थान आणि कोलकाता यांच्यासाठी प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग सोपा आहे, मात्र अजून ते अधिकृतरित्या प्लेऑफसाठी पात्र ठरलेले नाहीत. यामागचे कारण म्हणजे अद्यापही ते प्लेऑफमधून बाहेर होऊ शकतात.

सध्याच्या समीकरणानुसार कोलकाता आणि राजस्थान यांच्याव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे चार संघही 16 गुण मिळवू शकतात. यातील दिल्ली कॅपिटल्सने 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 6 पराभूत झाले आहेत.

त्याचमुळे दिल्लीला जास्तीत जास्त 16 गुणच मिळवता येणार आहे, परंतु हैदराबाद, दिल्ली आणि लखनौ या तीन संघांनी प्रत्येकी 11 सामन्यांमधील 6 सामन्यांत विजय आणि 5 सामन्यांत पराभव स्वीकारलेला असल्याने त्यांचे सध्या 12 गुण आहेत. त्यांना जास्तीत जास्त 18 गुण मिळवता येणार आहेत.

Kolkata Knight Riders | Rajasthan Royals
Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

त्याचमुळे जर कोलकाता किंवा राजस्थान किंवा हे दोन्ही संघ त्यांचे उर्वरित तिन्ही साखळी सामने पराभूत झाले, तर त्यांच्यावर अजूनही स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढावू शकते.

यामुळे आता राजस्थान आणि कोलकाताला अधिकृतरित्या प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी कमीत कमी एका विजयाची गरज आहे.

अद्याप कोणाचेही आव्हान संपलेले नाही

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या संघांना 16 गुणांपर्यंत पोहचता येणार नसले, तरी त्यांचे आव्हान अधिकृतरित्या संपलेले नाही.

सध्या बेंगळुरु, पंजाब आणि गुजरात यांनी 11 सामन्यांमधील 7 सामन्यात पराभव स्विकारला असून 4 सामन्यांत विजय मिळवला आहे. तसेच मुंबईने 12 सामन्यांमधील ८ सामन्यांत पराभव आणि 4 सामन्यांत विजय मिळवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com