nab.jpg 
महाराष्ट्र बातम्या

मोठी ब्रेकिंग..! नागरी बॅंकांवर नाबार्डच्या नियंत्रणाचा प्रस्ताव 

तात्या लांडगे

सोलापूर : सहकारी बॅंकांना अडचणीवेळी अर्थसहाय करणारी शिखर संस्था म्हणून नाबार्डची ओळख आहे. या संस्थेला सहकारातील अडचणींची पुरेपूर माहिती असतानाही सहकारी बॅंकांवर नाबार्डचे नव्हे तर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण आहे. त्यामुळे सहकारी बॅंकांनाही व्यापारी बॅंकांप्रमाणेच वागणूक मिळत असल्याने अनेक सहकारी बॅंका अडचणीत सापडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सहकारी बॅंकांवर नाबार्डचे नियंत्रण असावे, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान व अर्थमंत्र्यांना पाठविले आहे. 


देशात एकूण एक हजार 544 नागरी सहकारी बॅंका असून त्यामध्ये चार लाख 84 हजार कोटींच्या ठेवी आहेत. तर महाराष्ट्रातील 497 नागरी बॅंकांमध्ये तब्बल दोन लाख 93 हजार कोटींच्या ठेवी आहेत. बंद पडणारे अनेक उद्योग सावरण्यात आणि ग्रामीण व शहरी अर्थकारण सुधारण्यात नागरी बॅंकांनी मोठे योगदान दिले आहे. मात्र, नागरी बॅंकांना बोर्ड ऑफ डायरेक्‍टर व बॅंकेचे व्यवस्थापन मंडळ नियुक्‍त करणे बंधनकारक आहे. तसेच लहान कर्जदारांनाच त्यांनी कर्जवाटप करावे, अडचणीतील सहकारी बॅंक मोठ्या सक्षम बॅंकेत विलीन करता येणार नाही, असे निर्बंध आरबीआयने घातले आहेत. व्यापारी बॅंका व सहकारी बॅंकांमध्ये मोठा फरक असतानाही रिझर्व्ह बॅंक दोघांनाही एकाच तराजूत मोजत असल्याने नागरी बॅंकांसह बहूतांश सहकारी बॅंका अडचणीत येणार आहेत, असे त्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. 
 

नाबार्डच्या नियंत्रणासाठी उच्च स्तरीय समिती 


देशातील एक हजार 544 नागरी बॅंकांपैकी 70 टक्‍के बॅंकांना नाबार्डचे नियंत्रण मान्य झाल्यास एक स्वतंत्र अभ्यास गट तथा उच्चस्तरीय समिती नियुक्‍त केली जाणार आहे. या समितीचा अहवाल केंद्रीय अर्थमंत्री व रिझर्व्ह बॅंकेला पाठविला जाईल. तत्पूर्वी, नागरी सहकारी बॅंकांवर नाबार्डचे नियंत्रण असावे, असा प्रस्ताव पाठविला आहे. 
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, दि महाराष्ट्र अर्बन को.ऑप. बॅंकस्‌ फेडरेशन 

 
प्रस्ताव पाठविण्याची ठळक कारणे... 

  • अवसायनातील तथा कमकुवत सहकारी बॅंका मोठ्या सहकारी बॅंकेत विलीनीकरणास नाही परवानगी 
  • नागरी को-ऑप. बॅंकांसह जिल्हा बॅंकांना अर्थसहाय करणारी नाबार्ड ही प्रमुख वित्तीय संस्था 
  • सहकाराची पुरेशी माहिती नसलेल्या रिझर्व्ह बॅंकेकडून सहकारी बॅंकांना व्यापारी बॅंकांप्रमाणेच मिळतेय वागणूक 
  • नागरी को-ऑप. बॅंकांच्या विस्तारास तथा शाखा वाढीस मिळत नाही मागील सात वर्षांपासून परवानगी 
  • कर्जवाटपावर रिझर्व्ह बॅंकेने घातले निर्बंध: बोर्ड ऑफ डायरेक्‍टरची घातली सक्‍ती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde: भाजप सरकारचा स्मार्ट मीटर कायदा अदानींचा फायदा : खासदार प्रणिती शिंदे; जनतेसाठी रस्त्यावर उतरावे लागणार

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : जयशंकर यांनी सिंगापूर दौऱ्यात विवान बालकृष्ण यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक संबंधावर चर्चा

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

SCROLL FOR NEXT