महाराष्ट्र

'नैसर्गिक साधनांचा अतिवापरामुळे तुटवडा'

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘अतिवापरामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण होत आहे. तसेच, पर्यावरणीय समस्या वाढत आहेत. भविष्यात याहीपेक्षा बिकट आव्हाने निर्माण होतील. त्यांचा सामना करण्यासाठी व पर्यायी उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे,’’ असे मत शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

शालेय मुलांमध्ये विज्ञानाविषयीची आवड निर्माण होण्यासाठी द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यावतीने ‘आयुका’ येथे विद्यार्थी आणि शास्त्रज्ञ यांच्या संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता, या वेळी ते बोलत होते. ‘आयुका’चे संचालक डॉ. शोमक रायचौधरी, ॲकॅडमीच्या माजी अध्यक्षा मंजू शर्मा, प्रा. परमजीत खुराना उपस्थित होते. खुराना यांनी या वेळी जीवशास्त्रीय विज्ञान याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. काकोडकर म्हणाले, ‘‘विज्ञानातील संशोधनातून नावीन्यपूर्ण बाबी समोर येतात. त्यातून जिज्ञासू वृत्ती जागृत होते. नवीन काहीतरी केल्याचा आनंदही मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्राचा अभ्यास करावा.’’ डॉ. रायचौधरी म्हणाले, ‘‘अवकाश संशोधन हे एक व्यापक क्षेत्र आहे. अवकाशातील घडामोडींबाबत वेगवेगळे संशोधन जगभरात केले जात आहे. विविध प्रकल्प, तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सध्या होत असून, भविष्यात या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात घेऊन त्यादिशेने  प्रयत्न करावेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT