Rain
Rain Sakal
महाराष्ट्र

राज्यात पावसाचा जोर ओसरणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोकण किनारपट्टीच्या समांतर तयार झालेल्या हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे गेले काही दिवस कोकण, (Konkan) मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि विदर्भात (Vidarbha) बहुतेक ठिकाणी, तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली होती. आता मात्र बुधवार (ता. २१) पर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. (Rain Slowly in Maharashtra)

पुढील काही दिवस राज्यभरात आकाश ढगाळ राहील तर दुपारनंतर तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. सोमवारी कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला, असे हवामान खात्याने कळविले आहे. राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो असे नाही. सुरवातीला पावसाने हजेरी लावल्यानंतर दडी मारल्याच्या घटना आपण अनेकदा पाहिले आहे.

मॉन्सूनची प्रगती..

नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वायव्य-उत्तर भारतातील प्रगती संथ गतीने होत आहे. सोमवारी मॉन्सूनची उत्तरसीमा बारमेर (राजस्थान), भिलवाडा, ढोलपुर, अलीगड (उत्तरप्रदेश), मेरठ, अंबाला आणि अमृतसर (पंजाब) अशी आहे. राजस्थान, पश्चिम उत्तरप्रदेश, हरियाना, दिल्ली, पंजाबमध्ये मॉन्सूनच्या प्रगतीस अजूनही पोषक वातावरण नाही. तसेच तेथे मॉन्सूनचा पाऊस सक्रिय होईलच असे नाही. उत्तर-पश्चिम बिहारवर तयार झालेले हवेची चक्रीय स्थिती आणि उत्तर राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेल्या हवेच्या द्रोणिय स्थितीमुळे बिहारमध्येपुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात राज्यात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT