महाराष्ट्र

पुण्यासह राज्यात आज सरीवर सरी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे-मुंबईसह राज्यातील 24 जिल्ह्यांत मंगळवारी (ता. 20) ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने सोमवारी वर्तवला. 

बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यान चक्रिय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती पावसासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत (ता. 24) पावसाच्या हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडणार आहे. आज (ता. 20) कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बंगालच्या उपसागराच्या पश्‍चिम भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती अजूनही कायम आहे. दरम्यान, अरबी समुद्राच्या पश्‍चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्‍यता आहे. बंगाल उपसागराचा पश्‍चिम मध्य भाग व आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह अधूनमधून पाऊस पडणार आहे, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले. राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने सकाळी काही प्रमाणात धुके पडत असल्याची स्थिती आहे. 

या जिल्ह्यांत पडेल पाऊस 
ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ, वाशीम. 

मुसळधारेने झोडपले 
पुणे शहराच्या विविध भागांना सोमवारी दुपारी मुसळधार सरींनी पुण्याला पुन्हा झोडपले. सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता; पण दुपारनंतर आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे भरदुपारी अंधारून आले. त्यानंतर काही वेळातच पावसाच्या दमदार सरी कोसळू लागल्या. तासभर पाऊस बरसत होता. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील वेधशाळेत 15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे फक्त ढगाळ वातावरण होते. तेथे तुरळक सरींनी हजेरी लावली. तेथे 0.2 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहिले. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर वाहतुकीचा वेग मंदावल्याचे दृश्‍य रस्त्यारस्त्यांवर दिसत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT