Raj Thackeray question to Uddhav Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : चार भिंतीत ठरलेल्या गोष्टी आधी का नाही सांगितल्या? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

शहा भाषणात सांगतात. फडणवीस मुख्यमंत्री होईल. तेव्हाच...

सकाळ डिजिटल टीम

सत्तासंघर्षानंतर राज्यात शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपसोपत जात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन केलं. नवं सरकार स्थापन होऊन दोन महिन्यापेक्षी अधिक काळ उलटला असला तरी राज्यात अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भातील चर्चेला अजून ब्रेक लागला नाही. यावर आता राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. (Raj Thackeray question to Uddhav Thackeray )

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रवर निशाणा साधला होता. जर अमित शहा यांनी मला दिलेला शब्द अडीच वर्षांपूर्वी पाळला गेला असता तर आज अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. असे म्हटले होते. हाच मुद्दा पकडत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी सुनावलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर बोलताना राज ठाकरे यांनी अडीच वर्षाच मुख्यमंत्रीपद कुठून आलं ? असा सवाल उपस्थित केला आहे. १९८९ साली आमच्या मातोश्रीवर किंवा सेंटर हॉटेलला असेल. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे होते. मनोहर जोशी होते. प्रमोद महाजन होते. गोपिनाथ मुंडे होते. असे काही भाजपकडचे आणि शिवसेनेकडचे नेते होते. आणि त्यावेळी एक फॉर्मुला ठरला होता.

ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री आता त्याप्रमाणे पाहिलं तर ९५ ते ९९ युती सरकारच्या काळामध्ये शिवसेनेचे आमदार जास्त होते. मला त्या संपूर्ण चार साडेचार वर्षामध्ये कधीही भाजपने मुख्यमंत्रीपदाचा दावा केला आहे असं मला आठवत नाही. ९९ ला निवडणुकीतनंतर बदल झाला. मग हा फॉर्मुला युतीमध्ये ठरलेला होता.

तर तुम्ही अचानक निकालानंतर मुख्यमंत्रीपद अडीच वर्षात होत आणि मला ते दिलं पाहिजे म्हणता? असा सवाल उपस्थित करत तुम्ही चार भिंतीत ठरलेल्या गोष्टी जाहीरपणे याच्या आधी का नाही सांगितलं. आणि त्यावेळी उद्धव ठाकरे व्यासपीठावर हजर असताना पंतप्रधाना नरेंद्र मोदी सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, अमित शाह सह फडणवीसदेखील हेच सांगत होते. तुम्ही मग त्याचवेळी आक्षेप का घेतला. असा सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Rule: फ्रँचायझींकडून हरकती अन् आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये बदल; वादग्रस्त नियम हटवणार? BCCI च्या Emailमध्ये नेमकं काय?

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT