court esakal
महाराष्ट्र बातम्या

बलात्कारातून जन्मलेल्या मुलीला मिळणार पोटगी; न्यायालयाचा आदेश

डीएनए चाचणीच्या मदतीनं पीडितेला न्याय मिळणार

सकाळ डिजिटल टीम

देशात प्रथमच डीएनए चाचणीच्या मदतीनं बलात्कार पीडितेला न्याय मिळणार आहे. १३ वर्षापूर्वी बलात्कारातून जन्मलेल्या मुलीला पोटगी देण्याचा आदेश भंडारा (Bhandara) सत्र न्यायलयाने (Court) दिला आहे. या एेतिहासिक निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळणार आहे.

भंडारा जिल्ह्यातील एका मुलीवर १३ वर्षांपूर्वी बलात्कार झाला होता. त्यातून तिला आपत्य जन्मले. यासंदर्भात तिच्या कुटुंबाने न्यायलयात धाव घेतली. आणि आज तब्बल १३ वर्षांनी न्याय मिळाला आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यू झालेला आहे. तिच्या कुटुंबाने आरासनुसार मुलीला न्याय मिळावा अशी न्यायलयाला विनंती केली आहे.

न्यायलयाच्या आदेशात काय म्हटंल आहे

१३ वर्षांपूर्वी बलात्कार झालेल्या मुलीला पोटगी देण्याचे आदेश भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. दिलेल्या आदेशामध्ये संबंधित मुलीला जन्मापासून लग्नापर्यंत पाच हजारांची पोटगी देण्याचा आदेश आहे. त्यासाठी आरोपीच्या अचल संपत्तीवर न्यायालयाने आठ लाख रुपयांचा बोजा चढवला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीचा मृत्यू झालेला असल्यानं आरोपीच्या कुटुंबीयांना पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोटगी न दिल्यास आरोपीच्या संपत्तीचा लिलाव करून रक्कम वसूल करण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT