महाराष्ट्र

कोकण लोहमार्गावरील डबलडेकर बंद करणार?

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोकण लोहमार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित डबलडेकरचे आरक्षण फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी लवकरच बंद केली जाईल, अशी शक्‍यता आहे. तोट्यात चालणाऱ्या प्रसिद्ध तेजस एक्‍स्प्रेसचे थांबे वाढवून ती डबलडेकरच्या वेळेवर चालविण्यात येईल, अशी चर्चा सुरू आहे.

वातानुकूलित डबलडेकर सुरवातीला एलटीटी ते करमाळी मार्गावर सुरू करण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसाठी काही महिन्यांनंतर करमाळीऐवजी मडगावपर्यंत चालविण्यात आली; परंतु या गाडीच्या देखभाल-दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष, मुंबईतून गाडी सुटण्याची असलेली वेळ आणि ठिकाण यामुळे प्रवाशांनी डबल डेकरकडे पाठ फिरविली. फक्त सरासरी 30 टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही गाडी बंद करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारीपासून आरक्षण रद्दच करण्यात आले आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते करमाळी अशी तेजस एक्‍स्प्रेस आरामदायी सुविधांमुळे प्रसिद्ध होती. या गाडीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली असून शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी गाडीला गर्दी असते. यामुळे रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी "तेजस'च्या मार्गावरील थांबे वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. विमान प्रवासासारख्या सुविधांची रेलचेल असलेल्या "तेजस'ला 24 मेपासून हिरवा कंदील दाखविण्यात आला. आठवड्यातून पाच दिवस धावणारी ही गाडी साडेआठ तासांत अंतर कापते.

"तेजस'चे थांबे वाढविण्यासंदर्भात विचार सुरू आहे. त्याचा प्रस्ताव अद्याप तयार झालेला नाही.
- एल. के. वर्मा, जनसंपर्क अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT