Chandrakant Patil and Mahatma Gandhi
Chandrakant Patil and Mahatma Gandhi 
महाराष्ट्र

...तर धंगेकर गांधींना स्वर्गातून घेऊन येतील; चंद्रकांत पाटलांचं पुन्हा वादग्रस्त विधान

सकाळ डिजिटल टीम

Pune By Election 2023- पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघांच्या पोटनिवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे. भाजपकडून कसबा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसब्यावर लक्ष ठेवून आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील प्रचारात उतरले आहेत. मात्र आज त्यांनी प्रचार सभेत वादग्रस्त विधान केलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, धंगेकर महात्मा गांधींनी प्रचाराला घेऊन येतील. शेवटच्या दोन दिवसांत धंगेकर गांधींना स्वर्गातून घेऊन येतील. पाटील यांच्या या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

यावर काँग्रेसनेते अतुल लोंढे म्हणाले की, यांना महत्मा गांधींची भीती यांना १९२५ वर्षांपासून वाटते. आजही त्यांची भीती आहे. याचा अर्थ असा होतो, गांधींच्या विचारावर चालणारी काँग्रेस यांच्या हुकूमशाहीला आणि मनुस्मृतीला अडसर ठरत आहे.

मात्र काँग्रेस कधीही आजारी व्यक्तीला प्रचारासाठी बाहेर काढणार नाही, वाटल्यास निवडणूक सोडून देईल. यांनी लक्ष्मण जगताप आणि मुक्ती टिळक यांच्यासोबत तेच केल्याचा लोंढे यांनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT