Vehicle-Registration
Vehicle-Registration 
महाराष्ट्र

आरटीओलाही मंदीचा फटका

सकाळ वृत्तसेवा

वाहनविक्री घटल्याने उत्पन्नात दीड हजार कोटींची घट अपेक्षित
सोलापूर - उद्योग क्षेत्रासह अन्य क्षेत्रांत मंदीचे सावट कायम असून, त्याचा सर्वाधिक फटका वाहनविक्रीला बसला आहे. नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, नागपूरसह अन्य उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वाहनांची नोंदणी कमी झाली असून, राज्यात इतरत्रही असेच चित्र आहे. मंदीमुळे महसुली उत्पन्नावर परिणाम झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा परिवहन विभागाला दीड हजार कोटींचा फटका बसेल, असा अंदाज राज्य परिवहन विभागाच्या सूत्रांनी व्यक्‍त केला. उद्दिष्टपूर्तीसाठी आता बेशिस्त वाहनचालक रडारवर असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात दरवर्षी सरासरी ९८ लाख वाहनचालक वाहतूक नियम मोडतात अन्‌ त्यांच्याकडून सुमारे १९० कोटींचा दंड वसूल केला जातो. दरम्यान, यंदा जुन्या-नव्या वाहनांचा कर, वाहननोंदणी, वाहन व वाहतूक परवाना, बेशिस्त वाहतूक यातून राज्य परिवहन आयुक्‍तालयाने आठ हजार ५५० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहे. मात्र, मागील दोन महिन्यांत वाहनविक्रीत मोठी घट झाल्याचा परिणाम महसुली उत्पन्नावर झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर उद्दिष्टानुसार कारवाई करावी, अशा सूचना आयुक्‍तालयाने दिल्या असून, त्यानुसार कारवाईचे नियोजनही केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT