महाराष्ट्र

कठीण परिस्थितीतही बजावला मतदानाचा हक्क

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे आपल्याला लहानपणापासूनच सांगितले जाते. मात्र तरीदेखील अनेकांना याचा विसर पडलेला दिसून येते. मतदानादिवशी सुट्टी असल्याने अनेकजण पिकनिकचा प्लॅन करुन बाहेर जातात आणि मतदान करणे टाळतात.

मात्र याउलट काहीजण कितीही कठीण परिस्थिती असेल तरीदेखील न चुकता आपला मतदानाचा हक्क बजावतात. अशाच एका शिर्डीतील 106 वर्षे वय असणा-या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजावत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. छबुबाई भगिरथ कु-हे असे त्यांचे नाव असून त्यांनी श्रीरामपूर मतदार संघातील बेलापूर गावात मतदानाचा हक्क बजावला आहे.

तसेच नाशिकचे प्रकाश पवार हे मागील काही काळापासून आजाराला झुंज देत रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्यांचे डायलिसिस सुरु असून त्यांना डॅाक्टरांनी बाहेर न पडता आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र मतदान करणे किती महत्त्वाचे आहे याची जाणिव असल्याने प्रकाश यांनी गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत जाऊन मतदान केले आहे. याच ठिकाणी 81 वर्षे वय असलेल्या नीलिमा लोया यांनीदेखील मतदान केले असून त्यांची नुकतीच बायपासची शस्त्रक्रिया झाली होती.

दरम्यान याप्रकारे परिस्थिती, आरोग्य आणि वय या सर्वांचा विचार न करता प्रत्येकानेच मतदानाचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. तसेच मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, याची देखील जाणिव प्रत्येकाने ठेवायला हवी. हेच या सर्व उदाहरणातून समोर येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT