road accident
road accident sakal
महाराष्ट्र

रस्ते अपघात वाढले! अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देणाऱ्या पालकास होईल ३ वर्षांचा कारावास

तात्या लांडगे

सोलापूर : अडीच वर्षांत दीडशेहून अधिक जणांचा सोलापूर शहर हद्दीत रस्ते अपघातात मृत्यू झाला असून त्यात अल्पवयीन वाहनचालक देखील आहेत. दरवर्षी सरासरी १३ हजार जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतोय. या पार्श्वभूमीवर १६ वर्षांपर्यंतच्या मुलांनी वाहन चालविण्याचा गुन्हा केल्यास त्याच्या पालकाला मोटार वाहन कायद्यानुसार तीन वर्षांचा कारावास व २५ हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा होईल. तसेच संबंधित चालकाला व वाहनाच्या मूळ मालकास प्रत्येकी पाच हजाराचा दंड भरावा लागणार आहे.

दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढतच असून त्याला वाहनचालकांचा बेशिस्तपणा कारणीभूत ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी आता विशेष मोहीमांच्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे नियोजन आखले आहे. महाविद्यालयांबाहेर तशा अल्पवयीन मुलांवर वाहतूक पोलिसांचा वॉच असणार आहे.

सोलापूर शहरातून ये-जा करणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकीला परिसरनिहाय ताशी ३० ते ४० किमी वेगाची मर्यादा असून जड वाहनांसाठी ताशी २० किमी तर तीन व चारचाकी वाहनांना ताशी ३० किमीपर्यंत वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, सर्रास वाहनचालक त्याचे पालनच करीत नाहीत. विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांची संख्या भरमसाठ वाढली असून त्यात अल्पवयीन चालकांचाही समावेश आहे. दुचाकीस्वार स्वत:च्या सुरक्षिततेसाठी देखील हेल्मेट वापरत नाहीत. त्यांच्यावर आता कठोर कारवाई केली जाणार आहे.

बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त महत्त्वाची

सोलापूर शहर हद्दीतील बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी, यासाठी दहा-पंधरा दिवसातून एकदा नाकाबंदी करून विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलिसांना मार्चएण्डचे टार्गेट वगैरे असे काही नसते, अपघात रोखणे हाच कारवाईचा मुख्य उद्देश असतो.

- अजित बोऱ्हाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

‘या’ बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष

  • ताशी २० ते ४० किमीपर्यंत वेगाची मर्यादा असतानाही वेगमर्यादा ओलांडणारी वाहने

  • रस्त्याच्या विरूद्ध दिशेने धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे

  • मद्यपान करून किंवा मोबाईलवर बोलत वाहन चालवणे

  • फॅन्सी नंबरप्लेट व दुचाकीवर ट्रिपलसीट तथा चारचाकीत सीटबेल्टचा वापर न करणे

  • वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही बिनधास्तपणे वाहन चालवणारे चालक

मद्यपींची ‘सिव्हिल’मध्ये होणार रक्त तपासणी

मद्यपान करून अनेकजण वाहने चालवितात. आता पोलिसांच्या कारवाईत तसा संशयित आढळल्यास त्याची ब्रिथ ॲनालायझर मशीनद्वारे तपासणी होईल. त्यात दोषी आढळल्यास त्याची शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) रक्त तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर त्या मद्यपी चालकाविरूद्ध मोटार वाहन कायद्यातील १८५ कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात पाठवले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT