sakal
sakal 
महाराष्ट्र

'सकाळ'च्या दिवाळी अंकांतून अनुभवांचे समृद्ध चित्रण 

सकाळवृत्तसेवा

पुणे : मराठी अक्षरविश्‍वात समृद्ध साहित्य घेऊन येणारे "सकाळ माध्यम समूहा'चे सर्व दिवाळी अंक बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. जीवन समृद्ध करणाऱ्या लेखनापासून तुमच्या-आमच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचे, घटनांचे विश्‍लेषण आणि अनुभवसंपन्न विचार "शब्ददीप', 'ऍग्रोवन', "सकाळ साप्ताहिक', "तनिष्का' आणि "प्रीमिअर' या दिवाळी अंकांमध्ये आहेतच; शिवाय "सकाळ'ने यंदा वाचकांसाठी आणखी एक खास भेट आणली आहे. ती म्हणजे "सरकारनामा' हा राजकीय विशेषांक! 

राज्यातील हुकूमाचा एक्का कोण? 
सुजाण आणि राजकीय विचारशक्ती जागृत असलेल्या मराठी वाचकांसाठी "सरकारनामा' ही यंदाची आगळी भेट आहे. भोवताली चाललेल्या राजकीय कोलाहलातून नेमके काय आणि कसे निवडायचे, याची मांडणी "सरकारनामा'मध्ये आहे. "2019 मध्ये हुकूमाचा एक्का कोण ठरणार' याबद्दल जनतेच्या मनातील महासर्वेक्षणही या अंकात आहे. 

नेमका काय आहे भारत? 
सध्याची सामाजिक घुसळण बघता डावीकडून उजवीकडे "भारत नेमका काय आहे?' हे उलगडणारा परिसंवाद अर्थात "आयडिया ऑफ इंडिया' हे "शब्ददीप'चे विशेषाकर्षण आहे. शिवाय, लेहपासून केरळपर्यंतच्या प्रवासात भेटलेली भन्नाट माणसं आणि त्यांच्या अफलातून कथा यांचे रिपोर्ताज "शब्ददीप'मध्ये असतील. राज्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या आठवणीही अंकात आहेत. 

नुसतेच प्रश्‍न नव्हे; उत्तरंही! 
मजूर समस्येवर मात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कथा "ऍग्रोवन'च्या दिवाळी अंकात आहेत. शेतीच्या समस्यांवर सकारात्मक मार्ग काढणाऱ्यांच्या यशकथांनी हा अंक सजला आहे. शिवाय, कृषी क्षेत्रातील नवे शोध, बदलणारी शेती यावरही विचारधन या अंकात आहेच. 

याशिवाय, आयुष्य बदलून टाकणारे अनवट प्रवास आपल्या भेटीस येणार आहेत "सकाळ साप्ताहिक'च्या दिवाळी अंकातून. खंबीरपणे उभं राहणाऱ्या स्त्रियांनी शोधलेल्या नव्या वाटांची कहाणी असेल यंदाच्या "तनिष्का'मध्ये, तर मनोरंजनाच्या दुनियेतील बित्तंबातमी घेऊन त्या जोडीला स्टार्स आणि त्यांच्याबद्दलची रंजक माहिती घेऊन येत आहे "प्रीमिअर' हा दिवाळी अंक. 

सकाळचे दिवाळी अंक आता अमेझॉनवर !
वाचकांसाठी विशेष सोय.. आता आपला दिवाळी अंक घरपोच मिळवा.. 

शब्ददीप: https://goo.gl/XwXccB
सरकारनामा: https://goo.gl/JF5K9w
अॅग्रोवन: https://goo.gl/Jn7VTF
साप्ताहिक सकाळ: https://goo.gl/66fLKh
तनिष्का: https://goo.gl/793JRP
प्रिमीयर: https://goo.gl/wA31Nx

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT