sangram jagtap fight in election with ncp
sangram jagtap fight in election with ncp 
महाराष्ट्र

राष्ट्रवादीकडून पुन्हा रण"संग्राम'!

विनायक लांडे

नगर - ""आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची त्यांच्याबाबतची चर्चा निष्फळ आहे. ती केवळ विरोधकांची चाल आहे. गेल्या पाच वर्षांत आमदार जगताप यांनी भरीव अनेक कामे केली. आता कॉंग्रेस- "राष्ट्रवादी'ची आघाडी झाली आहे. त्यामुळे ते "राष्ट्रवादी'कडूनच निवडणूक लढविणार आहेत,'' असा निर्वाळा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांनी दिला.

नगरमध्ये आज (रविवारी) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधाते म्हणाले, ""आम्ही सर्व जण पक्षासाठी एकजुटीने, निष्ठेने काम करतो. त्यामुळेच कामाची पावती म्हणून प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर केलेली शिस्तभंगाची कारवाई मागे घेत पुन्हा शहर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली. शहरात आमदार जगताप यांनी आयटी पार्कच्या रूपाने अनेकांना रोजगार उपलब्ध केला. आगामी काळात नव्याने आणखी चार कंपन्या आणण्याचा त्यांचा मानस आहे.''

पवार शुक्रवारी नगरमध्ये
"राष्ट्रवादी'चे संस्थापक शरद पवार यांचा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचा दौरा सुरू होत आहे. मंगळवारी (ता. 17) सोलापूरपासून दौऱ्याला सुरवात होईल. उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, औरंगाबादनंतर नगरला शुक्रवारी (ता. 20) मुक्कामी येणार आहेत. दुसऱ्या दिवशी (ता. 21) जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. त्यानंतर साताऱ्याकडे रवाना होणार आहेत, असे विधाते यांनी सांगितले.


पक्षाने काळे यांना समज द्यावी
विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर अभिषेक कळमकर शहराच्या जागेवर दावा करीत आहेत का, हे माहीत नाही; मात्र युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांचा नामोल्लेख टाळत, ""ते आमदारकीचे तिकीट मिळेल, असा दावा करीत आहेत. त्यातून आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात ते बोलत असतील, तर पक्षाने त्यांना समज देणे गरजेचे आहे,'' असेही विधाते यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT