Sanjay Raut to Dada Bhuse
Sanjay Raut to Dada Bhuse e sakal
महाराष्ट्र

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, संजय राऊतांचा दादा भुसेंना टोमणा

धनश्री ओतारी

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आता शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला जावून मिळाले आहेत. दादा भुसेंच्या या बंडखोरीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असा टोमणा राऊतांनी दादा भुसेंना लगावला.(Sanjay Raut to Dada Bhuse)

खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. मात्र, राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहेत. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या. अशा शब्दात राऊतांनी ट्विट करत भुसेंना मारला आहे.

दादा भुसे गुवाहाटीत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathore), आमदार रवींद्र फाटक (Ravindra Phatak), किनवट विधानसभा संघटक सचिन नाईक (Sachin Naik) हे गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा झटका आहे.

विशेष म्हणजे दादा भुसे यांच्यासह इतर आमदारांच्या आगमनानंतर रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर पोलिसांचा प्रचंड फौजफाटेसह बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT