sanjay raut
sanjay raut e sakal
महाराष्ट्र

अजितदादा आमचं ऐका, नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत - संजय राऊत

सुधीर काकडे

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. भोसरीमध्ये झालेल्या या मेळाव्यात संजय राऊत यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संपर्क प्रमुख सचिन आहिर आणि सहसंपर्क प्रमुख म्हणून आदित्य शिरोडकर यांची करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी यावेळी महानगपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांशी बोलताना चौफेर फटकेबाजी केली.

आगमी काळातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये कोणाचे कितीही नगरसेवक आले तरी महापौर सेनेचाच झाला पाहिजे, त्यासाठी तयारी करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. तसेच आपल्याला एकत्र काम करायचे आहे म्हणत, आमच्या लोकांना नाराज करु नका, असे आवाहन अजित पवार यांना केलं. तसेच त्यांनी जर ऐकले नाही, तर मुख्यमंत्री दिल्लीत गेलेच आहेत असे म्हणत त्यांनी मिश्किल शेरेबाजी केली आहे.

शिरूर लोकसभा आणि पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी भोसरीतील गोविंद गार्डन कार्यालयात सुरु आहे. यामध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत आगामी नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहीर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, राज्य संघटक गोविंद घोळवे उपस्थित होते.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT