Sharad Pawar
Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र

Sharad Pawar : ‘आम्ही काय करतो ते आम्हाला ठाऊक’

सकाळ वृत्तसेवा

ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी अग्रलेखातून केलेल्या टीकेचा आज समाचार घेतला.

सातारा - ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी अग्रलेखातून केलेल्या टीकेचा आज समाचार घेतला. पक्षात वारसदार निर्माण करण्यात पवारांना अपयश आल्याची टीका राऊत यांनी मुखपत्रातील अग्रलेखातून केली होती.

त्यावर बोलताना पवार म्हणाले की, ‘आम्ही आमच्या पक्षात जो काही निर्णय घेतो, ते आम्ही बाहेर जाऊन प्रसिद्ध करत नाही. राज्यात १९९९ मध्ये काँग्रेस व आमचे संयुक्त मंत्रिमंडळ करायचे होते. त्यावेळी नवीन मंडळींना सामावून घेण्याचे ठरविले होते. जयंत पाटील, अजित पवार, वळसे -पाटील, देशमुख, आर. आर. पाटील अशी अनेक नावे आहेत. त्यांच्या आयुष्यातील सत्तेचा तो पहिला काळ होता. त्यांची आम्ही नियुक्ती केली.

मी राज्यमंत्री म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर मला प्रमोशन मिळाले होते; पण ही जी नावे घेतली त्या मंडळींना थेट कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. त्या प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तृत्व दाखवले त्यामुळे आम्ही जे काही तयार करतो, ते कर्तृत्व दाखवते. आम्ही काय करतो, हे आम्हाला ठाऊक असते. त्यामुळे त्यांनी लिहिले तरी काहीही फरक पडत नाही.’ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पवार साताऱ्यात आले होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चव्हाणांची कॅटेगरी कोणती....

कर्नाटक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची ‘बी’ टीम असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. याबाबत पवार म्हणाले, ‘‘त्यांच्या पक्षात त्यांचे काय स्थान आहे? ‘ए’, ‘बी’, ‘सी’ की ‘डी’ आहे ते एकदा तपासावे. त्यांच्या पक्षातील एका सहकार्याला विचारले तर त्यांची कॅटेगरी कोणती आहे, ते तुम्हाला समजेल.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: प्रचार सभेतील केजरीवालांच्या विधानावर ईडीचा आक्षेप! सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं? वाचा

SRH vs GT Live Score : गुजरात जाता जाता हैदराबादला धक्का देणार की SRH प्ले ऑफचं तिकीट सेफ करणार?

Fact Check: प्रभू श्रीरामांची प्रतिकृती हातात घेतलेला ओवेसींचा 'तो' फोटो एडिटेड

Latest Marathi News Live Update : पिंपरीत होर्डिंग कोसळलं, चार दुचाकींचं नुकसान

ED Action : ''जप्त रक्कम मंत्री आलम यांचीच'', ‘ईडी’चा न्यायालयात दावा; प्रत्येक कंत्राटामध्ये १.५ टक्के वाटा

SCROLL FOR NEXT