SRH vs GT : हैदराबाद - गुजरात सामना पाण्यात! काही न करता पॅट कमिन्सचा संघ पोहचला प्ले ऑफमध्ये

Pat Cummins
SRH vs GT IPL 2024 esakal

SRH vs GT : हैदराबाद - गुजरात सामना पाण्यात! काही न करता पॅट कमिन्सचा संघ पोहचला प्ले ऑफमध्ये

सनराईजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आहे. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुणावर समाधान मानावे लागले.

SRH vs GT Live Score : हैदराबादमध्ये पुन्हा पावसाचं थैमान; नाणेफेकच काय सामन्यावरही दाटले ढग

हैदराबादमध्ये पावसाने पुन्हा थैमान घालणं सुरू केलं आहे. त्यामुळे हटवण्यात आलेले कव्हर्स पुन्हा मैदानात आले असून नाणेफेकीस पुन्हा उशीर होत आहे. पावसाचा जोर पाहता नक्कीच सामन्याची षटके कमी करण्यात येतील.

SRH vs GT Live Score : पावसामुळे नाणेफेकीस उशीर; सामना 20 षटकांचाच होणार?

पावसामुळे नाणेफेकीस उशीर झाला असून आता पावसाने उसंत घेतल्याने नाणेफेक 8 वाजता होणार आहे. सामना पूर्ण 20 षटकांचा होणार आहे.

SRH vs GT : हेड टू हेड

सनराईजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत चार सामने झाले आहेत. त्यातील फक्त एक सामना हैदराबादला जिंकता आला आहे. तर गुजरातने 3 सामने जिंकले आहेत. मात्र दोन्ही संघांचा हैदराबादमध्ये आज पहिल्यांदाच सामना होत आहे.

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titians IPL 2024 : 

आयपीएल 2023 मधील सनराईजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे नाणेफेक न होताच रद्द करावा लागला. यंदाच्या हंगामातील दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आले आहेत. गुजरातचा प्ले ऑफमधून आधीच पत्ता कट झाला होता.

हैदराबादला मात्र पावसामुळे मिळालेल्या एका गुणाचा फायदा झाला आहे. ते 15 गुणांसह प्ले ऑफमध्ये पोहचले असून त्यांचा अजून एक सामना शिल्लक आहे. ते रविवारी पंजाब किंग्जसोबत सामना खेळणार आहेत. मात्र हा सामना आता एक औपचारिकताच राहिला आहे.

आता 18 मे रोजी होणाऱ्या आरसीबी आणि चेन्नई सामन्याची उत्कंठा वाढली आहे. आरसीबीला आता विजयासोबतच नेट रनरेटकडे देखील लक्ष द्यावे लागणार आहे.

दुसरीकडं चेन्नई जिंकली तर ते थेट प्ले ऑफमध्ये पोहचतील. जरी त्यांचा पराभव झाला तरी जर आरसीबीपेक्षा ते आपलं नेट रनरेट चांगल ठेवू शकले तर चेन्नईला प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com