zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती २२ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी सोलापूर शहर-जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह दोन हजार १०४ शाळांमधील ४० हजार ५३८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या वर्गातील विद्यार्थ्यांची ही शेवटची परीक्षा असणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती २२ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी सोलापूर शहर-जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह दोन हजार १०४ शाळांमधील ४० हजार ५३८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या वर्गातील विद्यार्थ्यांची ही शेवटची परीक्षा असणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यापुढे इयत्ता चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाणार आहे. अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यिता शाळांमधील विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेला बसू शकतात. या परीक्षेत विद्यार्थ्यांना दोन पेपर द्यावे लागणार आहेत. प्रत्येक पेपर १५० गुणांचा असतो. वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्न असतात.

विद्यार्थ्यांना बहुपर्यायातून एक अचूक पर्याय निवडावा लागतो. दरम्यान, पूर्वीपासून इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचीच शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. पण, काही वर्षांपूर्वी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. आता तो पुन्हा बदलण्यात आला असून यापुढे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचीच परीक्षा होणार आहे.

चौथी व सातवीची २६ एप्रिलला परीक्षा

इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील सुमारे ५० हजार विद्यार्थी आहेत. परीक्षेच्या निकालानंतर मेरिटमध्ये आलेल्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पाच हजार रुपये आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती शासनाकडून दिली जाते. पुढील तीन वर्षे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते.

शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल ठळक...

  • पाचवीतील २७ हजार ४८२ व आठवीचे १३ हजार ५६ विद्यार्थी देणार परीक्षा

  • पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी १४४ तर आठवीच्या विद्यार्थ्यांची ९२ केंद्रांवर परीक्षा

  • प्रत्येकी १५० गुणांचे दोन पेपर असतात; वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात

  • मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तेलगू, कन्नड माध्यमातून होणार परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGCA Action on Air India : 'एअर इंडिया'ला मोठा झटका!, 'डीजीसीए'ने ठोठावला १ कोटी रुपयांचा दंड

Mumbai Local: चाकरमान्यांना दिलासा! मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर १९ फेब्रुवारीपासून अतिरिक्त ट्रेन चालवणार, पण कोणत्या? वाचा...

सोलापूर जिल्ह्यातील ६ ‘पीआय, एपीआय’च्या बदल्या! मोहोळ, मंद्रूप, कामती, वेळापूर, माढा, नातेपुते पोलिस ठाण्यांचे आता ‘हे’ प्रभारी, वाचा...

Valentine Day 2026 'व्हॅलेंटाईन डे' साठी शॉपिंग करताय? मग 'या' ट्रेंडी अन् स्टायलिश कपड्यांची करा खरेदी, सर्वजण करतील कौतुक

Pune News : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे १२ सदस्य; विरोधकांची रणनीती काय, कोणाला मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT