Indian flag
Indian flag sakal media
महाराष्ट्र

सर्व शाळा १५ ऑगस्टला ध्वजवंदन करून सुरू कराव्यात, सरकारकडे मागणी

संजीव भागवत

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव (corona infection) कमी झालेल्या जिल्ह्यात सरकारकडून 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास अनुमती दिली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी दोनच दिवस अगोदर भारतीय स्वातंत्र्य (Indian independence day) संग्रमाचा उत्सव असलेला 15 ऑगस्ट (15th august) हा स्वातंत्र्यदिन आहे, त्यादिवशी सर्व शाळांमध्ये ध्वजवंदन (indian flag) करून या शाळा सुरू (school starts) करण्यासाठी सरकारने निर्णय घेऊन तसे आदेश द्यावेत अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटने सरकारकडे केली आहे.

मागील दोन वर्षांत कोरोनामुळे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि इतर कोणत्याही प्रकारच्या महापुरूषांच्या जयंती उत्सव शाळांमध्ये साजरे होऊ शकलेले नाहीत. मात्र आता सरकार शाळा सुरू करणारच आहे तर ती 15 ऑगस्टदिवशी ध्वज वंदन करून करावी अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली आहे.

राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे 30 जुलैच्या परिपत्रकात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय येथे ध्वजारोहण- समारंभ करणे संबंधित सूचना देण्यात आली आहे. फक्त शैक्षणिक संस्थेत ध्वज फडकवण्याचा निर्देश नाहीत. शाळा स्तरावर फक्त ऑनलाईन देशभक्तीपर गाणे,भाषण,निबंध,वाद विवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी करून असे उपक्रमाद्वारे साजरा करण्याची सूचना आहे. त्यामुळे सरकारने 15 ऑगस्ट या ऐतिहासिक दिनाच्या दिवशी राष्ट्रीय कर्तव्याचा धडे शिकवून चांगले नागरिक निर्माण करणारी संस्थेत तिरंगा ध्वज फडकवणे महत्त्वाचे आहे, ऑनलाईन उपक्रम बरोबर शाळाचे मुख्याध्यापक व जवळपास राहणारे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते,काही पालक व विदयार्थ्यांची मर्यादित उपस्थितीत साधेपणाने ध्वज वंदन करणाऱ्यात यावेत असे सुधारित निर्देश जारी करावेत अशी मागणीही पंड्या यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

SRH vs GT Live Score : गुजरात जाता जाता हैदराबादला धक्का देणार की SRH प्ले ऑफचं तिकीट सेफ करणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

T20 World Cup 2024 : न्यूयॉर्क की फ्लोरिडा... भारताच्या सराव सामन्याबाबत गोंधळ

Latest Marathi News Live Update : ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिंदेंच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT