Crime
Crime 
महाराष्ट्र

कळसकर अखेर 'सीबीआय'च्या कोठडीत

सकाळवृत्तसेवा

मुंबई - नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी न्यायालयाने अखेर "सीबीआय' कोठडी सुनावली. वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांना 15 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. जालन्यातून अटक करण्यात आलेल्या श्रीकांत पांगारकरची रवानगी 6 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत करण्यात आली. अविनाश पवारच्या पोलिस कोठडीत 4 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. या सर्व आरोपींना न्या. विनोद पाडळकर यांच्यासमोर आज हजर केले होते.

शुक्रवारच्या सुनावणीत एटीएस आणि सीबीआयला खडे बोल सुनावत, कायदेशीर प्रक्रियाच न्यायालयाने समजावून सांगितली होती. पवारला अटक केल्यानंतर सहा दिवस काय करत होता, असा सवाल करत पोलिस डायरीसह सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यास सांगण्यात आले होते. आरोपींच्या चौकशीत त्यांच्या "हिट लिस्ट'वर असलेल्या व्यक्तींची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली. ही नावे उघड केली तर तपासावर परिणाम होईल, अशी भीती एटीएसने व्यक्त केली होती. मात्र, आदेशात या बाबींचा उल्लेख करणे आवश्‍यक आहे, असे नमूद करत न्यायालयाने एटीएसची ही विनंती धुडकावून लावली.

आरोपींच्या रडारवर असलेल्या डॉ. श्‍याम मानव, जितेंद्र आव्हाड, मुक्ता दाभोलकर आणि रुतू राज या व्यक्तींच्या नावाचा उल्लेख आदेशपत्रात केला.

वकिलांची कानउघडणी
या चार व्यक्तींची आणि त्यांच्या येण्या-जाण्याच्या ठिकाणांची रेकीही या आरोपींनी केली असल्याची बाब "एटीएस'ने न्यायालयात उघड केली. त्यावर याची कागदपत्रे यापूर्वीच्या सुनावणीत पोलिस डायरीसोबत का दिली नाहीत, अशी विचारणा न्यायालयाने केली. ही कागदपत्रे होती, असे वकिलांनी सांगितल्यानंतर मी प्रकरणाचा नीट अभ्यास केला. त्यानंतर सर्व कागदपत्रे तपासूनच सुनावणीसाठी बसलो आहे, अशा शब्दांत न्यायालयाने वकिलांची कानउघडणी या वेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT