Sharad Pawar appreciated role taken by Udayanraje Bhosale central govt  sakal
महाराष्ट्र बातम्या

Udayanraje Bhosale : उदयनराजेंनी घेतलेल्या भूमिकेचं शरद पवारांकडून कौतुक

केंद्र-राज्य सरकारवर सडकून टीका

हेमंत पवार

कऱ्हाड : खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतलेली भूमिका ही चांगलीच आहे. त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. मात्र राज्य आणि केंद्र सरकारने जी काय काळजी घ्यावयाची आहे, कारवाई करायची आहे त्यामध्ये ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे, असा टोला माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज केंद्र व राज्य सरकारला लगावला. विजय दिवस समाराहोसाठी खासदार पवार आज येथे आले असता माध्यमांशी बोलत होते. गेले काही दिवसांपासून सातत्याने महापुरुषाबाबत बेजबाबदार वक्तव्य होत आहेत.

याबाबत खुद्द भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दोनदा पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांची भेट घेतली. मात्र तरीही कोणतीही कार्यवाही झाली नाही याबाबत खासदार पवार म्हणाले, खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतलेली भूमिका ही चांगलीच आहे. त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. मात्र राज्य आणि केंद्र सरकारने जी काय काळजी घ्यावयाची आहे, कारवाई करायची आहे त्यामध्ये ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे, असा टोला त्यांनी लगावला.

महाविकाच्या मोर्चाला परवानगी

महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळाली या प्रश्नावर खासदार शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे कालचे स्टेटमेंट ऐकले, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे. त्याचा योग्य तो निर्णय होईल. त्यामुळे मोर्चाला परवानगी मिळाली यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. एकच आहे की या मोर्चा संदर्भात लोकांमध्ये औत्सुक्य आहे. महापुरुषांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये राग आहे. विशेषता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जी जबाबदार व्यक्तीने केलेली विधाने सामान्य माणसांना अस्वस्थ करणारे आहेत. त्याची प्रतिक्रिया उद्या, भविष्यात दिसेल असा मला विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

Numerology for Pets: कुत्रा, मांजर, मासे की पक्षी? अंकशास्त्रानुसार पाहा तुमच्या मूलांकासाठी कोणता प्राणी आहे लकी...

Indian Army: पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताच्या ड्रोनवर अमेरिकेची नजर; युद्ध सरावादरम्यान काय घडलं?

दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा थेट CM Devendra Fadnavis यांना सवाल

कोल्हापुरात मिरवणुकीत तणाव; दोन गट भिडले, लोकांची धावपळ

SCROLL FOR NEXT