sharad pawar
sharad pawar  esakal
महाराष्ट्र

Sharad Pawar : बहुमत नसताना सत्तेचा स्वीकार करणे मला योग्य वाटले नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे - 'एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान होण्यापूर्वी कॉंग्रेस पक्षाची बैठक झाली होती. तेव्हा कॉंग्रेस व त्यांच्यासमवेतचे सर्व घटक पक्ष त्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताची स्थिती नव्हती. बहुमत नसताना सत्तेचा स्वीकार करणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे तेव्हा, पंतप्रधानपदाबाबत निर्णय घेण्याचा प्रश्‍नच नव्हता' अशा शब्दात, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

भाजपचे खेड तालुका समन्वयक अतुल देशमुख यांनी गुरुवारी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, विकास मुंगसे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत चीन संबंध निवडणुकीमध्ये आणल्याच्या प्रश्‍नाबाबत पवार म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. 1974 मध्ये इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना एक छोटे बेट श्रीलंकेला दिले, त्यावरुन आता चर्चा रंगवली जाते. पण त्यांनी अशा चर्चाऐवजी चीन भारताच्या भूमीवर अतिक्रमण करत असताना त्यांनी नेमक्‍या काय उपाययोजना केल्या, याची उत्तरे द्यावीत.

लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाने विरोधकांना सन्मान द्यायचा असतो. पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासह सर्व पंतप्रधानांनी संसदेत विरोधकांचा सन्मान केला. असे असताना, देशात एकही विरोधी पक्षाचा नेता निवडून येऊ द्यायचा नाही, असे मोदी आपल्या भाषणात सांगतात. संजय राऊत, पुतीन व नरेंद्र मोदी यांच्यात काहीही अंतर नाही, असे सांगतात, ते योग्य बोलतात असे वाटू लागले आहे.''

कोल्हापूरचे कॉंग्रेस उमेदवार शाहू महाराज यांच्यावर संजय मंडलीक यांनी टीकेबाबत पवार म्हणाले, 'राजघराण्यामध्ये दत्तक घेणे हे काही नवीन नाही. शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक काम मोठे आहे. अनेक शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व शाहू महाराज हेच करत आहेत. लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे. पण हा सगळा प्रचार व राजकारण किती खालच्या पातळीला चालू आहे, याची मानसिकता दिसून येते.'

'राज ठाकरे यांनी १५ वर्षात तीन ते चार भूमिका घेतल्या, आता आणखी दोन-तीन दिवसात वेगळे काही करतात का पाहू, असा टोला पवार यांनी लगावला. एकनाथ खडसे यांच्याबद्दल ते म्हणाले, 'खडसे यांच्या खूप चौकशा केल्या, त्यांच्या संस्था बंद केल्या, त्यांना दैनंदिन खर्च चालवण्यावरही त्यांनी मर्यादा आणल्या.

त्यामुळे ते अक्षरशः हतबल झाले होते. त्यांनी त्यांच्या व्यथेतून सोडवणूक करण्यासाठी आमच्याशी त्यांनी चर्चा केली. तेव्हा, तुम्ही गेलात तरी आमची गैरसोय होणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितले.'

धैर्यशील मोहिते पाटील दोन दिवसात पक्षप्रवेश

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत धैर्यशील मोहिते यांच्याशी चर्चा झालेली नाही. मात्र ते आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करतील.

विजयदादा मोहिते पाटील हे सध्या शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. त्यांना बोलण्याचा त्रास होतो. तिथला प्रत्येक निर्णय हा विजयदादांच्या संमतीने व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच होतो, असे सांगून पवार यांनी धैर्यशील मोहिते यांच्या उमेदवारीबाबत गुप्तता पाळली.

मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात बारामतीकरांनी आता सुनेला निवडून द्या, पवार आडनावाच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन केले होते, त्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर आपल्या नर्मविनोदी शैलीत पवार यांनी "अजित पवार हे काहीही चुकीचे बोलले नाहीत. मुळ पवार आणि बाहेरून आलेला, हा फरक ओळखा' अशी कोटी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पवार म्हणाले, 'माझी, अजितची, सुप्रियाच्या निवडणुकीवेळी आमचे सगळे कुटुंब लोकांमध्ये जात होते. लोकांमध्ये सहभागी होऊन त्यांचे आशीर्वाद घेत होते. आता कुटुंबातील प्रत्येकाचे व्यवसाय, शिक्षण या सगळ्या गोष्टी तुम्हाला व सगळ्या जगाला माहीत आहेत.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT