Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांना राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसचा पाठिंबा - नाना पटोले

राष्ट्रपती निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची मोट बांधण्यास पुढाकार घेत दिल्लीत एका संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभेच्या निवडणुकीची धामधूम जरा थंड झाल्यानंतर आता देशाचं लक्ष आगामी राष्ट्रपती निवडणुकीकडे लागलेलं आहे. यासाठी आता सत्ताधारी आणि विरोधक दोघेही कंबर कसून कामाला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. (Congress will support Sharad Pawar for President Election)

राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचं नाव उमेदवार म्हणून पुढे येण्याच्या चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी पाठिंबा दर्शवला आहे. शरद पवारांना जर राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केलं तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची मोट बांधण्यास पुढाकार घेतला आहे. १५ जून रोजी दिल्लीत एका संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी शरद पवारांसह अनेक प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. दिल्ली, केरळ, झारखंड, ओडिशा, तेलंगण, तमिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२६

Video: अंपायरने नॉट आऊट दिलं, पण कर्णधार वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक! शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मिळाली विकेट

Jat Wildlife Attack : सांगलीत धक्कादायक घटना! जतमधील अंकले येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 75 वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू, शेळ्या चारण्यासाठी गेले अन्...

Marathi News Live Updates : कोल्हापूर शहरात आज आणि उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, काय आहे कारण?

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

SCROLL FOR NEXT