Sharad_20Pawar
Sharad_20Pawar 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : आम्ही तलवार म्यान करत नसतो- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आम्ही तलवार म्यान करत नसतो, एकदा हातात घेतल्यानंतर आम्ही युद्ध केल्याशिवाय आम्ही माघार घेत नसतो. आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुका लढणार आहोत. माझा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने लढेल आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी'चे नेते अजित पवार यांनी आज (ता.27) अचानक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. पत्रकार परिषेदरम्यान, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने राजीनामा दिला आहे याचा निवडणुकांवर काय परिणाम होईल या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांच्या राजीनाम्याचा आगामी विधानसभा निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे यातून स्पष्ट केले आहे. 

अजित पवार यांच्या राजीनाम्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती, पण, ते माझे नाव ईडीच्या कारवाईत आल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते. त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचे कारण मलाही जाणून घ्यायचे आहे. अजित पवारांनी राजीनाम्याविषयी माझ्याशीही कुठल्याही प्रकारची चर्चा केली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT