Shiv Sena going backfoot after Amit Shah statement
Shiv Sena going backfoot after Amit Shah statement 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : भाजपच्या ‘शहा’गिरीने शिवसेना बॅकफूटवर

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 
मुंबई -  ‘‘कुछ भी हो, या कुछ भी ना हो, जीत हमारी पक्‍की है,’’ असा अप्रत्यक्ष स्वबळाचा नारा देत मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याच्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्‍तव्याने शिवसेना बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत ‘आमचं ठरलं आहे,’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते सांगत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या जागावाटपाचे घोंगडे भिजत पडले आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना प्रत्येकी निम्म्या जागा लढविणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. तसेच, निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी सुरवातीला शिवसेनेने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपद मिळावे, अशी मागणी भाजपकडे केली आहे. यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभरात लाँचिंग सुरू आहे. आता निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडून युतीबाबत बैठका होणार आहेत. त्यापूर्वी भाजपने शिवसेनेला जागावाटपाचा फॉर्म्युला दिला आहे. तो शिवसेनेला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे. २८८ पैकी निम्म्या जागा किंवा १३५ च्या खाली जागा स्वीकारण्यास शिवसेना तयार नाही. मात्र, भाजप शिवसेनेसाठी १२० च्या आसपास जागा देण्यास तयार असल्याची चर्चा आहे.

लाऊंजमध्येच चर्चा
मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. या वेळी विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये शहा, फडणवीस आणि पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत युती आणि जागावाटपाची चर्चा करण्यात आल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गोरेगावच्या कार्यक्रमात शहा यांनी त्यांच्या भाषणात शिवसेना भाजप युती आणि जागावाटपाचा साधा उल्लेखही केला नाही, यामुळे युतीचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT